तान्हाजी या चित्रपटातले एकून एक प्रसंग थरार आणतातच शिवाय या चित्रपटाची सर्वत्र वाहवाही सुरू असून सध्या हाऊसफूल शोज सुरू आहेत. चित्रपटात दिमाखदार विलनची भूमिका सैफ-अली खान तर शूरवीर सेनापती तान्हाजी मालुसरे यांची भूमिका अजय देवगण याने चांगलीच वठवली आहे. या सर्वांमधे एक गोष्ट घडली ती चक्क आश्चर्य वाटेल अशी ती म्हणजे, ४५ जणांनी चित्रपटातून सिट्स रिकाम्या सोडल्या.

प्रेक्षकांच “तान्हाजी-द अनसंग वाॅरिअर” या चित्रपटावर कमालीच प्रेम बरसत असलेलं सध्या पाहायला मिळतयं आणि त्यात अशी घटना कानावर पडताच तुम्हाला वेगळ वाटू शकतं.

पण मुळात घटनेचा संदर्भ असा आहे, मुंबई मधे दादर येथील हिंदमाता चित्रपटगृहामध्ये कर्करोगग्रस्त मुलांसाठी ‘तान्हाजी’ चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. मात्र आयोजक व चित्रपटगृहातील व्यवस्थापक यांच्यातील समन्वयाअभावी या मुलांच्या स्क्रिनिंगची वेळ चुकली.

विशेष म्हणजे ही गोष्ट चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी याविषयी प्रेक्षकांना सांगितलं. याची नोंद घेत प्रेक्षकांनी समजुतदारपणा दाखवला आणि उदार मनाने स्वत:ची जागा या मुलांना आणि त्यांच्या पालकांना दिली. ही माहिती काजोललादेखील समजल्यानंतर तिने ट्विटवर एक पोस्ट शेअर करत “हीच खरी माणुसकी आहे, आपणदेखील हा आदर्श घेऊन असंच काम केलं पाहिजे आणि हे कार्य पुढे नेलं पाहिजे”, अशा शब्दांत त्यांच कौतुक केलं.

अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ हा ऐतिहासिकपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने अजय पहिल्यांदाच ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळाला.

दरम्यान, ‘तान्हाजी’ या चित्रपटाची सध्या बॉक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड सुरु आहे. या चित्रपटाने केवळ 6 दिवसामध्ये 100+ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटामध्ये अजयने तान्हाजी मालुसरे यांची भूमिका साकारली असून काजोलने त्यांच्या पत्नीची भूमिका वठविली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.