‘डरने में कोई बुराई नही पर अपने डर को कभी इतना बडा मत बनाना की वो आपको आगे बढने से रोके’ My Name is Khan मधलं हे वाक्य ऐकून आपण सर्वानीच टाळ्या वाजवल्यात पण दर वेळी हे लागू होईलच असं नाही.काही गोष्टींची इतकी भीती वाटत असते की त्या कितीही कराव्या वाटल्या तरी नाही करता येत आणि मग जन्म घेतो ‘Phobia’. बऱ्याच लोकांना आजही Phobia म्हणजे नक्की काय हे माहिती नाही त्या सर्वांसाठीच हा लेख.
अगदीच साध्या भाषेत सांगायचं तर Phobia म्हणजे एखाद्या ठराविक गोष्टीची वाटणारी प्रचंड भीती कधीकधी ही भीती एवढी वाढते की एकटी व्यक्ती तिला समोरीच जाऊ शकत नाही तिला सतत त्या गोष्टीला समोर जायला कोणाची ना कोणाची मदत लागते.
Phobia हा कशाचाही असू शकतो म्हणजे अगदी उंची पासून पाण्यापर्यंत,कुत्र्यांपासून कोळी(spiders),झुरळांपर्यंत किंवा अगदी भुतांपासून माणसांपर्यंत. आता ह्यावर काही लोकांच मत असेल भुतांना काय घाबरायचं ती थोडीचं प्रत्यक्षात असतात भुतांपेक्षा माणसंच वाईट. आताची सामाजिक परिस्थिती पाहता हे खरं असलं तरी काही लोकांना भुतांची भीती वाटते जरी ती प्रत्यक्षात नसली तरी आणि ह्यालाच Phasmophobia म्हणतात.
खरंतर कुठल्याही रोगासारखी ह्याची लक्षणं लगेच दिसत नाहीत किंवा आपल्याला एखाद्या गोष्टीचा त्रास होतो पण बाकीच्यांना का होत नाही,त्यामुळे नक्की आपल्यासोबत असं का होतंय हेच बऱ्याच लोकांना कळत नाही आणि त्यांना phobia आहे हे समजत नाही.
Phobia म्हणजे मनातील भीती असली तरी तो काही मानसिक आजार नाही त्यावर उपचार आहेत.आता आपल्याला नक्की Phobia आहे का नाही हे मात्र प्रत्येकानी ठरवावं आणि नाही जमलं तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
अगदी साधी लक्षणं म्हणजे ज्या गोष्टीचा phobia आहे ती गोष्ट ती व्यक्ती इतरांसारखी करू शकत नाही, त्या गोष्टीचा खूप त्रास होतो त्यामुळे त्या व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक त्रासाला सामोरं जावं लागतं. प्रत्येकाचा phobia,त्याची लक्षणं वेगळी असतात ज्याला वेगवेगळी नावे देखील आहेत.जसं की-
- spiders (Arachnophobia)
- social situations (social phobia)
- open spaces (Agoraphobia)
- confined spaces (Claustrophobia)
- heights (Acrophobia)
- cancer (Cancerophobia)
- thunderstorms (fear of lightening – astraphobia; fear of thunder – Brontophobia)
- death (Necrophobia)
- heart disease (Cardiophobia)
हे झाले साधारण phobia पण ह्याउलट काही लोकांना भयंकर विचित्र phobia असतात ते पाहून पहिल्यांदा कोणालाही आश्चर्य वाटेल की असं कसं असू शकतं?पण हो असे काही phobia आहेत जे विचित्र असले तरी लोकांच्या जीवावर बेतणारे आहेत उदा.:-
Nomophobia-म्हणजे आपल्या फोनला चार्जिंग,recharge,range नसल्यावर वाढणारी भीती(मोबाईल वापरणाऱ्यांपैकी 50% लोकांना ह्या phobia ला सामोरं जावं लागतं)
- Anemophobia-वाऱ्याची भीती
- Spectrophobia-आरश्याची भीती
- Chorophobia-नृत्याची(dance ची भीती)
- Arachibutyrophobia- Peanut butter टाळूला चिटकेल ह्याची भीती
- Allodoxaphobia-कोणीतरी आपल्याला सतत मत, उपदेश देईल ह्याची भीती
- Optophobia-डोळे उघडण्याची भीती
हे सर्व विचित्र वाटत असले तरी खूप दुर्मिळ phobia पैकी आहेत ज्यांचा सामना लोकांना करावा लागतो.आणि कधीकधी हे इतके वाढतात की भीती वाटणारी गोष्ट आपला जीव घेतीये असं वाटून लोक मृत्युला सामोरे जातात.
असाच एक विचित्र आणि दुर्मिळ phobia म्हणजे Misophonia.डॉक्टरांच्या दृष्टीने अगदीच Phobia नसलेला किंवा आजारही नसलेला हा Phobia. Phobiaच्या जगात अगदीच नवा म्हणजे अवघ्या 20वर्षांचा हा phobia.
Misophonia म्हणजे आवाजांचा होणारा त्रास ह्यामध्ये ठराविक आवाज मेंदूतील पेशींसाठी stimulators म्हणून काम करतात ज्यामुळे तो आवाज ऐकला की चिडचिड होते,राग अनावर होतो,प्रसंगी माणूस हाणामारी करायला लागतो.
हे आवाज साधारणतः इतरांकडून खाताना होणार तोंडाचा आवाज,शिंकेचा आवाज,सर्दी किंवा खोकण्याचा आवाज,कधीकधी शिटी,बसल्याबसल्या नकळत लोकांकडून होणारा पायांचा आवाज किंवा अगदी पेनच्या झाकणाच्या आवाज असे असतात पण हे आवाज ऐकले की त्रास होतो आणि मग चिडचिड होते.
लोकांना सांगून तो आवाज थांबवण्याचा प्रयत्न होतो पण दरवेळी लोक ऐकूनच घेतील असं नाही मग वादविवाद,हाणामारी होते आणि परिणामी Misophonia असलेले लोक जिथे अशा गोष्टी घडत असतील त्या टाळण्याचा प्रयत्न करतात आणि एकटे पडतात.
Misophonia ची अजून एक खास गोष्ट म्हणजे जे आवाज त्रास देतात ते नेहमी इतरांकडूनच होतात म्हणजे स्वतः कडून जर तसा आवाज होत असेल तर त्याचा त्रास होत नाही कारण मुळात आपल्याकडून तसा आवाज होतोय हे त्या व्यक्तीला कळतंच नाही.
काही शास्त्रज्ञांच्या मते Misophonia हा Phobia आहे तर काहींच्या मते हा एक Neurological disorder म्हणजे तंत्रिका आजार आहे तर काहींच्या मते अनुवांशिक आजार(genetic disorder). अवघ्या 20वर्षांपूर्वी ह्या आजाराचा शोध लागल्याने अजूनही खात्रीशीर माहिती ह्याबद्दल उपलब्ध नाही.
काही संशोधनावरून असंही सिद्ध करण्यात आलंय की मेंदूच्या पुढचा भाग (Frontal lobe) हा सामान्य आकारापेक्षा लहान असतो म्हणून Misophonia होतो आणि त्यामुळे अशे लोक एकाचवेळी अनेक गोष्टींवर लक्ष देऊ शकतात,त्यामुळे ते कल्पक बुद्धीचे असतात.
Misophonia बद्दल फारशी माहिती उपलब्ध नसली तरी जी आहे त्यावरून उपाय शोधून काढल्या गेले आहेत. त्यानुसार Misophonia असणारे लोक Music therapy,self control, psychiatrist ह्यांची मदत घेऊन बरे होऊ शकतात.
-भक्ती संदिप