ventilator-review




Ventilator Marathi Movie Review

  • Review : Ventilator (2016) | व्हेंटिलेटर
  • Director : Rajesh Mapuskar
  • Producers : Priyanka Chopra & Dr. Madhu Chopra
  • Co-Producer :
  • Studio : Purple Pebble Pictures, Magij Pictures
  • Star Cast : Ashutosh Gowariker, Jitendra Joshi, Nikhil Ratnaparkhi, Satish Alekar & Sukanya Mone Story,

नातं म्हंटलं की कुटुंब आलं आणि कुटुंब म्हटलं की प्रेम, आपुलकी, माया या गोष्टी देखील आल्या पण त्या प्रेमा प्रमाणेच त्यात रुसवे-फुगवे, राग लोभ आणि हेवेदावे हे सुद्धा आपसुकच येतातच. एकत्र कुटुंबपद्धती ही जरी आपली संस्कृती असली तरी बदलत्या काळात ती सुद्धा बदलत चालली आहे.

आज कुटुंबे विभक्त झाली असली तरी त्यांच्यातलं प्रेम संपलय असंही नाही आणि अनेकदा एकत्र आले म्हणजे तिथे केवळ प्रेमच असतं असंही नाही. शेवटी कुटुंब हे माणसांनीच बनतं आणि माणसाच्या स्वभावातले गुण त्यातही उतरणं स्वाभाविकच असतं. अशाच एका कामेरकर कुटुंबाची गोष्ट तुम्हांला Ventilator  ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमातून पाहायला मिळणार आहे.

भर दिवाळ सणाच्या निमित्ताने मगीज पिक्चर्स यांच्या सहयोगाने पर्पल पेबल पिक्चर्स आणि झी स्टुडियोडज प्रस्तुत आणि प्रियांका चोप्रा आणि डॉ. मधू चोप्रा निर्मित ‘व्हेंटिलेटर’   Ventilator  हा सिनेमा एक कौटुंबिक मेजवाणी घेऊन या ४ नोव्हेंबरला प्रदर्शित झाला आहे.

Ventilator Marathi Movie




Ventilator 2016 Marathi Movie Mp3 song free Download

Ventilator  ‘व्हेंटिलेटर’ ही कथा आहे कामेरकर कुटुंबाची.  दरवर्षी गणेशोत्सव आपल्या वडिलोपार्जित घरात साजरा करणारं हे कुटुंब. या गणेशाच्या आगमनाची तयारी सगळीकडेच जोरदार चालू आहे आणि गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर आला असताना कुटुंब प्रमुख ‘गजू काका’ कोमामध्ये जातात आणि त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येते.

इथूनच कामेरकर कुटुंबात गोंधळाला सुरुवात होते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याबरोबरच अमेरिकेतील कामेरकर कुटुंबही या हॉस्पिटलमध्ये धाव घेतात. आणि इथून उलगडत जातो नात्यांचा एक अनोखा प्रवास.

एका घटनेमुळे कामेरकर कुटुंब एकत्र येतं आणि त्यासोबतच एकत्र येतात या कुटुंबातील लोकांचे स्वभाव, त्यांचे विचार, त्यांची मतं.. कुणाचा जिव्हाळा तर कुणाचा स्वार्थीपणा,कुणाचा आपलेपणा तर कुणाचा धूर्तपणा.. या सगळ्यांची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

एका घटनेमुळे एका जागी आलेलं कोकणातील हे कामेरकर कुटुंब आणि त्यातील सदस्यातून उलगडत जाणारे नात्यांचे विविध पदर हे अतिशय विनोदी पद्धतीने मांडण्यात आले आहे. काका, मामा, आत्या, बहिण, भाऊ, पुतण्या, नातू यांनी गजबजलेलं हे कामेरकर कुटूंब गजू काकाच्या निमित्ताने एकत्र आलेलं दाखवण्यात आलं आहे.

या चित्रपटाचं मूळ वैशिष्ट्य म्हणजे या सिनेमाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीतील तीन मोठी नावे पहिल्यांदाच मराठी चित्रपटासाठी एकत्र आली आहेत.

आपल्या दमदार अभिनयाने हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं आगळं-वेगळं स्थान निर्माण करणारी आजची आघाडीची अभिनेत्री प्रियांका चोप्राने ‘व्हेंटिलेटर’ मधून मराठी चित्रपटाच्या निर्मितीक्षेत्रात पदार्पण तर केलंच आहे त्याच बरोबर तिने या सिनेमात पाहूणी कलाकार म्हणून अभिनयाची छाप देखील पाडली आहे.

तसेच अनेक हिंदी चित्रपटांच्या यशामध्ये महत्त्वाचा वाटा असलेले आणि ‘फेरारी की सवारी’ यांसारखा हिट चित्रपट देणारे दिग्दर्शक राजेश मापुसकर  यांनी या चित्रपटामधून मराठी दिग्दर्शनात पदार्पण केलेलं आहे. हिंदीमध्ये एकाहून एक सुपरहिट चित्रपट देणारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर हे या सिनेमामध्ये मुख्य भुमिकेत दिसत आहे. यापूर्वी मराठी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटाद्वारे तब्बल अठरा वर्षांनी मराठीत पुनरागमन केलं आहे.

या सिनेमांत एकूण तीन गाणी आहेत, ‘या रे या’, ‘जय देवा’ आणि ‘बाबा’. बाबा या गाण्याचं अनोखं वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं priyanka chopra प्रियांका चोप्राच्या आवाजाने सजलेलं आहे. ‘बाबा’ Baba ही साधी सरळ पण प्रेमळ रचना गीतकार-संगीतकार रोहन-रोहन यांनी या गाण्यातून मांडली आहे.

बाप-मुलाचं अव्यक्त नात या गाण्याच्या निमित्ताने या दोघांनीही बोलकं करून सोडलं आहे. प्रत्येकालाच आपले बाबा खूप स्पेशल असतात आणि प्रियांकाला देखील होते म्हणूनच हे गाणं सगळ्यांच्याच हृदयाच्या खूप जवळचं असल्यासारखे वाटते. ऐकणा-या प्रत्येकालाच हळवं करणारी ही सुंदर रचना रोहन-रोहन यांनी अनोख्यारितीने पार पाडली आहे.

‘व्हेंटिलेटर’ ही नात्यांची गोष्ट आहे.  यातील घटना, पात्र, संवाद प्रत्येकाने कधी ना कधी तरी आपल्या उभ्या आयुष्यात अनुभवली असतील अशीच आहेत त्यामुळे चित्रपट बघताना प्रेक्षक त्याच्याशी आपसुकच जोडला जाईल हा विश्वास आहे.

या चित्रपटात आशुतोष गोवारीकर, जितेंद्र जोशी, संजीव शाह, सतीश आळेकर, अच्युत पोतदार, सुकन्या कुलकर्णी-मोने, सुलभा आर्या, उषा नाडकर्णी, निखिल रत्नपारखी, नम्रता आवटे-सांभेराव, निलेश दिवेकर यांसह अनेक लोकप्रिय कलाकार या मांदियाळीत पाहायला मिळणार आहेत.

चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद राजेश मापुसकर यांनी उत्तम रित्या मांडली असून  यांचे छायाचित्रण सविता सिंह यांनी केले आहे तसेच चित्रपटाचं संकलन रामेश्वर भागवत यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here