richa-agnihotri-does-her-photo-shoot-with-a-difference




Richa Agnihotri

Dholkichya Talavar  “ढोलकीच्या तालावर” नंतर आता सध्या साऊथ मधला “किक” kik हा डान्स रिअँलिटी शो गाजवत असलेल्या रिचा अग्निहोत्रीनं डान्स आणि पंचतत्वाचा मिलाफ घडवून आणणारं वेगळं असं फोटोशूट केलं आहे.
मराठी मनोरंजन क्षेत्रात डान्स आणि अभिनयात स्वतःचा वेगळा ठसा उमटवू पाहणाऱ्या रिचानं फोटो शूट साठी पंचतातत्वाची थीम वापरली. डान्सच्या पोझेस मध्ये आग,पाणी,हवा,आकाश,आणि धरती या पाचही तत्वांची आखणी केली.

त्यांचा वापर करत ती पारंगत असलेल्या डान्स ऍक्शन्स तिनं या फोटोशूट साठी वापरल्या आहेत.आगीचा वापर करतांना तलवारीचा उपयोग करून योध्याच्या लूक मध्ये ती समोर आली आहे तर त्याच तलवारीचा वापर करून तिनं फोटोमध्ये ग्लॅमरही आणलं आहे.

गिटार,पाणी आणि हाय डान्सीकल जम्प घेतली आहे. हिप हॉप आणि बी-बोईंग हे डान्स फार्म मुलींपेक्षा मुलांमध्ये जास्त पॉप्युलर आहेत.

पण आपण त्यातही मागे नाही हे रिचानं तिच्या डान्स शोज मधून दाखवून दिलंच आहे पण या फोटोशूट साठीही तिनं या डान्स फॉर्म मधल्या अवघड पोश्चर्सचा वापर केला आहे.
कथ्थक ह्या नृत्यशैलीत पारंगत असलेल्या रिचानं Dholkichya Talavar  ‘ढोलकीच्या तालावर’ मध्ये लावणी नृत्य करून बहार उडवून दिली होती आणि ती या रिअँलिटी शोमध्ये टॉप फाईव्ह पर्यंत पोहचली होती.

लावणी सोबत कथ्थक आणि झामा सारख्या वेस्टर्न डान्स फॉर्मचं फ्युजन करून लावणीत आपला वेगळेणा सिद्ध केला होता.

यानंतर तिची उदया टिव्ही वरील ‘किक’ या डान्स रिअँलिटी शोसाठी निवड झाली होती. सध्या ती हा शो गाजवत तिथेही टॉप एट पर्यंत पोहोचली आहे.

 

Richa Agnihotri Marathi Actress Photo

richa-agnihotri-akash-hip-hop

 

richa-agnihotri-bhumi-hip-hop




richa-agnihotri-fire

 

richa-agnihotri-water

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here