‘व्हेंटिलेटर’चा प्रीमिअर ‘मामि’ महोत्सवात

ventilator-premiere-in-mami-festival


Ventilator Premiere In Mami Festival

मामि महोत्सवात यंदा पहिल्यांदाच ‘मराठी टॉकीज’ भरवण्यात आली होती. या टॉकीजचा शुभारंभ पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि राजेश मापुसकर दिग्दर्शित ‘व्हेंटिलेटर’ (Ventilator)सिनेमाने झाला. मामि महोत्सवात दर्जेदार चित्रपटांची वर्णी लागते. यंदा सुरू झालेल्या मराठी टॉकीजमध्ये अशाच काही दर्जेदार सिनेमांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी या टॉकीज च्या शुभारंभातील चित्रपटाचा मान राजेश मापुसकर दिग्दर्शित व्हेंटिलेटर ने पटकावला. चित्रपट सुरू झाला…चित्रपट संपला आणि टाळ्यांचा एकच गडगडाट झाला. याबाबत बोलताना दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी ज्युरींचे आभार मानत… हा आनंद शब्दात मांडता येणे शक्य नसल्याचे म्हटले. दरम्यान राजकुमार हिरानी यांच्या येण्याने हा आनंद द्विगुणित झाल्याचे दिग्दर्शक राजेश मापुसकर यांनी म्हटले. पर्पल पेबल पिक्चर्स निर्मित आणि झी स्टुडिओज् प्रस्तुत व्हेंटिलेटर (Ventilator) सिनेमाच्या मामि प्रिमिअरला राजकुमार हिरानींसारख्या दिग्गजाबरोबरच चित्रपटातील अनेक कलाकार उपस्थित होते. आशुतोष गोवारिकर, जितेंद्र जोशी, सतिश आळेकर, सुलभा आर्या, सुकन्या कुलकर्णी, निखिल रत्नपारखी, संजीव शहा, विजू खोटे, स्वाती चिटणीस, निलेश दिवेकर, विनय निकम, भूषण तेलंग, नम्रता आवटे-सांभेराव, तन्वी अभ्यंकर, राहुल पेठे, नाना जोशी ही त्यातलीच काही नावं…दरम्यान चित्रपटाच्या निर्मात्या मधु चोप्रा ही यावेळी उपस्थित होत्या.



ventilator-marathi-movie-songs



आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणून लौकिक असणाऱ्या ‘मामि’ महोत्सवाची सुरूवात २० ऑक्टोबरपासून झाली. या महोत्सवात जगभरातील सर्वोत्तम चित्रपटांबरोबर भारतातील हिंदीबरोबरच प्रादेशिक भाषांच्या चित्रपटांचा प्रिमिअर दाखवण्यात येतो. यंदा या महोत्सवात पहिल्यांदाच ‘मराठी टॉकीज’ भरली होती. मॅगिज् पिक्चर्स च्या सहकार्याने बनलेला हा चित्रपट कित्येक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) च्या मराठी निर्मितीतला पहिला सिनेमा, मराठीतील मातब्बर मंडळींची फौज, प्रियांकाचे गाणे, आशुतोष गोवारिकर यांचा अभिनय आणि राजेश मापुसकर यांचे मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शकीय पदार्पण या सगळ्या वैशिष्ट्यांच्या जोडीला आता ‘मामि’ प्रिमियर च्या मराठी टॉकीज चा शुभारंभ करणारा चित्रपट… ही सुध्दा एक बाब ‘व्हेंटिलेटर’ (Ventilator) चित्रपटाच्या वैशिष्ट्यांमध्ये जोडली गेली आहे.
तेव्हा ‘मामि’ महोत्सवात पसंत केला गेलेला ‘व्हेंटिलेटर’  (Ventilator) चित्रपट पाहायला ‘या रे या, सा रे या’…येत्या ४ नोव्हेंबरला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here