नवनव्या संकल्पना असणाऱ्या दर्जेदार मालिका प्रेक्षकांसाठी घेऊन येणारी मराठी वाहिनी ‘झी युवा’, प्रेक्षकांची सर्वाधिक लाडकी वाहिनी आहे.
उत्तमोत्तम मालिकांच्या बरोबरीनेच अनेक उत्कृष्ट कार्यक्रम सुद्धा ‘झी युवा’च्या माध्यमातून प्रेक्षकांना पाहायला मिळतात. तरुणांच्या दैदिप्यमान कामगिरीचा सन्मान करण्यासाठी, गेली तीन वर्षे ‘झी युवा सन्मान’ हा सोहळा झी युवा वाहिनीवर आयोजित करण्यात येत आहे.
विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या युवा पिढीतील आदर्श व्यक्तींचा सन्मान या सोहळयात केला जातो. काही विशेष पुरस्कार या सोहळ्यात प्रदान करण्यात येतात. यंदाही हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.
या पुरस्कार सोहळ्यात, मराठी सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री वैदेही परशुरामी हिला ‘युवा तेजस्वी चेहरा’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
सोज्वळ चेहरा आणि निखळ अभिनय म्हणजे वैदेही परशुरामी. ति
चं सौंदर्य आणखी खुलवणारे सुंदर डोळे आणि उत्तम अभिनयकौशल्य यासाठी ती प्रसिद्ध आहे. अल्पावधीतच, केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात तिचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला आहे.
सोशल मीडियाच्या विश्वातसुद्धा तिने निराळी प्रसिद्धी मिळवली आहे.
प्रत्येक आव्हानात्मक भूमिका वैदेहीने मोठ्या पडद्यावर अगदी सहज सोप्या पद्धतीने साकारली मग ती FU मधील बिनधास्त रेवती असो किंवा डॉक्टर काशिनाथ घाणेकर मधली अल्लड कांचन, वजीर मधली समंजस नीना किंवा थेट सिम्बा या हिंदी चित्रपटातील तिने साकारलेली आकृतीची भूमिका असो.
मराठी सोबतच हिंदी चित्रपटात आपल्या यशस्वी वाटचालीला सुरुवात करणाऱ्या या लोकप्रिय अभिनेत्रीला शुभेच्छा आणि तिच्या कारकिर्दीला प्रोत्साहन देत वैदेहीचा सन्मान ‘झी युवा सन्मान’ सोहळ्यात करण्यात आला.
या पुरस्काराच्या बरोबरीने, इतरही अनेक पुरस्कारही देण्यात आले. सामाजिक, व्यावसायिक क्षेत्रातील पुरस्कार सुद्धा या सोहळ्यात प्रदान करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील गुणवान युवांचा हा भव्यदिव्य सन्मान सोहळा पाहायला विसरू नका, ‘झी युवा’ वाहिनीवर, शनिवार १४ नोव्हेंबर रोजी, दुपारी १२ आणि संध्याकाळी ७ वाजता!!!