Sonalee Kulkarni Sai Lokur Kranti Redkar

चित्रपट इंडस्ट्री मध्ये काम करणारी अभिनेते अभिनेत्री हे आयुष्याच्या जोडीदारा बाबत खूप विचार करून निर्णय घेतात. कुणाचं प्रेम होतं मग ते लग्न करतात. तर कुणाचं बाहेरच्या प्रतिष्ठित व्यक्ती सोबत लग्न जुळतं. इंडस्ट्री मधील अश्याच काही अभिनेत्री यांच्या बद्दल आपण जाणून घेऊयात.

असे अनेक मराठी कलाकार आहेत ज्यांनी फिल्म किंवा टीव्ही इंडस्ट्रीबाहेरचा जोडीदार शोधला आहेत. यात काहींचं लव्ह मॅरेज आहे तर काहींचं अरेंज. असे कोणते मराठी कलाकार आहेत..

सुशांतसिंग राजपूत मृ’त्यू’नंतर बाहेर आलेल्या ड्रग्ज प्रकरणात एक अधिकारी खूप चर्चेत आला होता. तो मराठी मधील एका प्रसिद्ध अभिनेत्री चा नवरा आहे. नाव आहे, समीर वानखेडे.

समीर वानखेडे अभिनेत्री क्रांती रेडकरचा पती समीर वानखेडे हा अंमलीपदार्थ विरोधी पथकात (एनसीबी) कार्यरत आहे. सध्या ड्रग्ज चौकशी करत आहेत.

अप्सरा आली फेम मराठीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या वाढदिवशी (१८ मे) साखरपुड्याची घोषणा केली. सोनालीचा होणारा पती कुणाल बेनोडेकर हा चार्टर्ड अकाऊंटंट असून दुबईत नोकरीला आहे. तीही लॉक डाऊन दरम्यान काही काळ दुबईलाचं होती.

सोशल मीडियावर ज्या अभिनेत्री ने लग्नाची घोषणा करून चर्चेचा विषय बनली, ती म्हणजे सई लोकूर. तिनेही इंडस्ट्री बाहेरचा जोडीदार शोधला आहे. तीर्थदीप रॉय ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री सई लोकूर लवकरच लग्नगाठ बांधणार आहे.

तीर्थदीप रॉयशी सईचा साखरपुडा झाला असून मॅट्रिमोनिअल वेबसाइटवरून या दोघांची ओळख झाली. येत्या ३० नोव्हेंबर रोजी हे दोघं लग्न करणार आहेत. तीर्थदीप हा आयटी कंपनीत नोकरी करतो.

अभिज्ञा भावे दुसरं लग्न करत आहे. आधीच्या नवऱ्या सोबत घटस्फोट घेतल्यानंतर पुन्हा ती लग्न बंधनात अडकली आहे. पण तिनेही इंडस्ट्री सोडून आयुष्याचा जोडीदार शोधला आहे.

मेहुल पै ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ यांसारख्या मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारणारी अभिनेत्री अभिज्ञा भावेनं नुकताच साखरपुडा केला. इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा मालक मेहुल पै याच्याशी ती लग्नगाठ बांधणार आहे. अभिज्ञा आणि मेहुलचं हे दुसरं लग्न आहे.

इंडस्ट्री बाहेरचा जोडीदार निवडण्याला ही खूप कारणे आहेत. कारण इंडस्ट्रीतला असला तर समजून उमजून न घेतलं तर घटस्फोट सारखा मोठा धोका सुद्धा पदरी पडू शकतो.