‘Shivaji Park Mumbai 28’ Mahesh Manjrekar’s New Marathi Movie

शिवाजी पार्क मुंबई २८

आजवर बऱ्याच मराठी कलाकारांनी कसदार अभिनयाच्या बळावर भारतीय चित्रपटसृष्टी गाजवली आहे. रंगभूमीपासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. दशकानु दशकं रसिकांची सेवा करणारे हे कलाकार आपापल्या परीने चित्रपटसृष्टी सशक्त बनवण्याचं काम करीत आहेतपण या सर्वांना एकत्र आणून एखादी संवेदनशील कलाकृती तयार करण्याची किमया अद्याप कोणीही केलेली नाही. निर्माता-दिग्दर्शक-अभिनेते महेश मांजरेकर यांनी शिवाजी पार्क मुंबई २८ या आगामी चित्रपटात हि किमया साधली आहे.

केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीतही लोकप्रिय असलेले दिलीप प्रभावळकरविक्रम गोखलेअशोक सराफसतीश आळेकरशिवाजी साटम हे दिग्गज कलावंत शिवाजी पार्क मुंबई २८ या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच एकत्र काम करताना दिसणार आहेत. सोबत शरद पोंक्षेउदय टिकेकरसविता मालपेकरसुहास जोशी आणि भारती आचरेकर हे ज्येष्ठ कलावंत सुद्धा या चित्रपटात आहेत. त्यामुळे शिवाजी पार्क मुंबई २८ हा चित्रपट म्हणजे जणू मराठीतील दिग्ग्ज कलाकारांना एकाच वेळी चंदेरी पडद्यावर पाहण्याची पर्वणीच ठरणार आहे. या जोडीला संतोष जुवेकरसुशांत शेलारदिप्ती लेलेमंजिरी फडणीस हे आजच्या पिढीतील तरुण कलाकारही या चित्रपटात दिसणार आहेत. 

महेश वामन मांजरेकर प्रस्तुत व गौरी पिक्चर्स निर्मित शिवाजी पार्क मुंबई २८ या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन करीत असूनमंगेश रामचंद्र जगतापशंकर रामेश्वर मिटकरी या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. नेहमीच विविधांगी विषयांवर आधारित असलेल्या चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शन करणारे महेश मांजरेकर शिवाजी पार्क मुंबई २८ या चित्रपटाचे  दिग्दर्शन करीत आहेत. शिवाजी पार्क मुंबई २८ या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पुण्यात संपन्न झाला असूनचित्रीकरणालाही सुरुवात करण्यात आली आहे.


अभिराम भडकमकर यांनी शिवाजी पार्क मुंबई २८चं लेखन केलं असूनछायांकन करण रावत करीत आहेत. शीर्षकापासूनच नावीन्य जपणाऱ्या शिवाजी पार्क मुंबई २८ या चित्रपटात नेमकं काय दडलंय ते अद्याप गुलदस्त्यातच असलं तरी एकंदरीतच सशक्त लिखाणकुशल दिग्दर्शन तसंच