Upcoming Highpoint in Ganapati Bappa Morya

 

Upcoming Highpoint in Ganapati Bappa Morya Colors Marathi Serial Cast Wiki Actor Actress Photos

गणपती बाप्पा मोरया मालिकेद्वारे मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पहिल्यांदाच एक अनोखा प्रयोग

Colors Marathi कलर्स मराठीवर प्रसारित होणारी गणपती बाप्पा मोरया ही मालिका आजवर मालिकेत करण्यात आलेल्या अनेकविध आणि अभिनव प्रयोगामुळे लोकप्रिय होते आहे… मग ते मालिकेचं ग्राफिक्स असो… वा  संवाद बोलताना बाप्पाची हलणारी सोंड असो… आदिशक्तीचं भव्य रुप असो किंवा श्रीविष्णूंच्या विविध अवतारांची गाथा असो…  पृथ्वी प्रदक्षिणा… गणेशाची मुंज… वेगवेगळ्या मेक अपसह महादेवांचं पंचमुखी रुप… असे अनेक माईल स्टोन्स ह्या मालिकेने गेल्या दीड वर्षांत दिले आहेत… ह्या लौकिकाला साजेशी आणखी एक अभिनव कल्पना लवकरच गणपती बाप्पा मोरया ह्या मालिकेत पाह्यला मिळणार आहे… सध्या मालिकेत सुरू असलेल्या सती गाथेमध्ये पद्मनाभ मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा प्रसंग दाखवण्यात येणार आहे… त्यात प्रथमच मालिकेत श्रीविष्णूंची भूमिका करणाऱ्या कलाकाराला बॉडी पेन्ट करुन मूर्तीच्या रूपात एक तासाच्या विशेष भागात सादर करण्यात येणार आहे…या साठी विष्णुची भूमिका साकरणार्‍या कलाकाराला (निरंजन कुलकर्णी) शूटिंग संपेपर्यंत मूर्तीरूपात बसावे लागणार आहे. यासाठी मेकअपला लागलेला वेळ हा 5 तासाचा होता. मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत अशाप्रकारचा प्रयत्न प्रथमच होतो आहे…

 

तेंव्हा बघायला विसरू नका गणपती बाप्पा मोरयाचा हा एक तासाचा विशेष भाग येत्या रविवारी, ५ मार्चला फक्त कलर्स मराठीवर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here