झी मराठीवरील तुझ्यात जीव रंगला ही मालिका प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळे या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. राणादा आणि पाठक बाई जणू प्रत्येकाच्या घराचा एक भाग बनले आहेत, त्यांच्या भूमिका प्रत्येक प्रेक्षकाला मनापासून आवडतात.

या मालिकेतील कलाकारांच्या भूमिका सर्व प्रेक्षकांना खूपच आवडतात म्हणूनच या कलाकारांच्या खाद्य आयुष्यात ज्या काही गोष्टी घडतात त्याबद्दल प्रेक्षकांना नेहमी कुतूहल असते. आज आम्ही तुम्हाला तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील एका कलाकाराबद्दल एक विशेष गोष्ट सांगणार आहोत.

या कलाकारांचे नुकतेच लग्न झाले आहे आणि त्याने या गोष्टीचा उलगडा त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वरून केला आहे त्याबद्दल आम्ही आपणास अधिक माहिती देणार आहोत.

तुझ्यात जीव रंगला सनी दा हे पात्र सर्वांना आवडते, त्याच्या भूमिकांमुळे प्रेक्षक त्याच्या आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, सनी दाने नुकतेच आता लग्न केले आहे.

 

View this post on Instagram

 

Grow old along with me! The best is yet to be. #RajKiMolly #2states #maratha #jatni #maharashtra #harayana #love #friends

A post shared by Raaj (@raj_hanchanale) on

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सनी दाची भूमिका राज हंचनाळे साकारत आहेत, राजने नुकतेच त्याच्या लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

#rajkimolly

A post shared by Molly (@happpy__molly) on

त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियाद्वारे भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. राजने सहा वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले असून त्याची पत्नी ही हरयाणाची आहे. या मुलीचे नाव मौली असून 2013 पासून राज आणि ती एकमेकांना ओळखतात.

राज आणि मौली दोघेही या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत असून त्यांची जोडी खूपच छान दिसत असल्याचे चाहते कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.