Aamir Khan & Jitendra Joshi ‘Satyamev Jayate Water Cup 2017’ ‘Paani Foundation’

आमिर खान आणि मराठी कलाकारांसह ‘तुफान आलंया’
“महाराष्ट्रातील जनता कोणत्याही संकटाचा सामना खंबिरपणे करते. येथील प्रत्येक गावात आणि गावकऱ्यांत कठीण परिस्थितीशी लढण्याची ताकद आहे आणि यामुळेच दुष्काळाच्या संकटावरसुद्धा हे गावकरी एकत्र येऊन मात करतील” असा विश्वास हिंदी चित्रपटसृष्टीतील मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने व्यक्त केला होता.

तुम्हांला आठवतंय, काही दिवसां अगोदर अभिनेता जितेंद्र जोशीने आमिर खान सोबतचे फोटोस् पोस्ट केले होते आणि ‘तुफान आलया’ असे म्हटले होते. या गोष्टीचा आता खुलासा करण्यात आला आहे.

आपल्या महाराष्ट्रात आता लवकरच एक भन्नाट स्पर्धा दाखल होतेय. या स्पर्धेत तीन संघ सहभागी असणार आहेत आणि ते तीन संघ म्हणजे विदर्भ योद्धा, मराठवाडा वीर आणि पश्चिम महाराष्ट्राचे मावळे. अनिता दाते, भारत गणेशपुरे, सई ताम्हणकर, सुनील बर्वे, गिरीश कुलकर्णी या कलाकारांचा या संघात सहभाग आहे. तर जितेंद्र जोशी ही स्पर्धा होस्ट करणार आहे आणि या कार्यक्रमाची निर्मिती दशमी क्रिएशन्स यांनी केली आहे. या कार्यक्रमाच्या प्रोमोचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. या संघाचे आता एकच लक्ष्य ते म्हणजे दुष्काळमुक्त महाराष्ट्र. जिंकणार कोण हे पाहण्यासाठी नक्की पाहा ‘तुफान आलंया’.

 

महाराष्ट्रात लवकरच दाखल होतेय एक भन्नाट स्पर्धा – सत्यमेव जयते वॉटर कप २०१७!

तीन संघ – विदर्भ योद्धा, मराठवाडा वीर आणि पश्चिम महाराष्ट्राचे मावळे!

एक लक्ष्य – दुष्काळमुक्त महाराष्ट्र!

जिंकणार कोण? प्रत्यक्ष बघा – ‘तुफान आलंया’!

८ एप्रिल पासून दर शनिवारी फक्त, फक्त आणि फक्त सगळ्या वाहिन्यांवर!

ABP माझा: रात्री ९ वाजता
IBN लोकमत: रात्री ९ वाजता
झी मराठी: रात्री ९:३० वाजता
कलर्स मराठी: रात्री ९:३० वाजता
स्टार प्रवाह: रात्री ९:३० वाजता
दूरदर्शन सह्याद्री: रात्री १०:०० वाजता
झी २४ तास: रात्री ११ वाजता

९ एप्रिलपासून दर रविवारी
जय महाराष्ट्र: सकाळी ९:०० वाजता