सिनेसृष्टी जितकी व्यापक असते तितक्याच प्रमाणात तिच्यात काम करणारे कलाकार, त्यांच वैयक्तिक आणि पब्लिक रिलेटेड आयुष्य या दोन्हींमधे कमालीची तफावत असते. आणि सिनेसृष्टीत बऱ्याचदा असं जाणवतं की, आपण जे कलाकार पाहते किंवा ते जे काही भुमिका निभावत असतात त्याच्यापेक्षाही अगदी विरोधाभास निर्माण करून जाणारं त्यांच वैयक्तिक आयुष्य अथवा त्यांची वैयक्तिक जडणघडण असते. तर आता मुळात आपण अशाच एका मराठी अभिनेत्रीबद्दल जाणून घेणार आहोत, जी वैयक्तिक आयुष्यात अगदी भन्नाट, निवांत आणि मॉडर्न स्वरूपात जगते. परंतु तिच्या ऑनस्क्रीन अभिनयाकडे पाहून तर असं काही वाटतचं नाही. तर ही अभिनेत्री म्हणजे दीक्षा केतकर. तुम्ही या अभिनेत्रीला आजवर “तू सौभाग्यवती हो”, या मालिकेतून पहात आला आहात.
या मालिकेत अगदी पारंपरिक लहेजातील अशा प्रकारची तिची भूमिका आपल्याला आढळून येते. परंतु दुसरीकडे तुम्ही पहाल तर ही अभिनेत्री अगदी मॉडर्न राहते. तिच्या आजवरच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरील फोटोंना तुम्ही स्वत: भेट देऊन पाहू शकता. दीक्षा तिच्या फोटोंनीच नाही तर त्यावर लिहिलेल्या अगदी मॉडर्न विचारांच्या प्रगल्भित असलेल्या कॅप्शन्समुळेदेखील स्वत:कडे सर्वांच लक्ष वेधून घेत असते. अभिनेत्री दीक्षाच्या बाबतीत एक धक्कादायक बाब जर तुम्हाला सांगायची म्हटलं तर ती अशी की, ही अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर याची बहिण आहे. ही गोष्ट अनेकांना आजवरही ठाऊक नाहीये. जेव्हा टिव्ही मालिकेत दीक्षाचं पदार्पण होणार होतं तेव्हा शशांकने तिच कौतुकही केलं होतं.
सध्या तू सौभाग्यवती हो या मालिकेत आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकून घेत असलेली दीक्षा खऱ्या आयुष्यात अगदी मॉडर्न रूपाने जगते. दीक्षाबद्दल बोलायचं म्हटलं तर तिने आजवर अनेक मराठी नाटकांमधून आपला अभिनय लोकांसमोर सादर केलेला पहायला मिळतो. इतकचं नाही तर दीक्षाने अगदी एक बालकलाकार म्हणून आपल्या अभिनयाची वाटचाल सुरू केली होती, जी आज यथार्थ स्वरूपाने उचित ठरत असल्याची पहायला मिळते आहे. अभिनेत्री दीक्षा हिने “सीआरएसएचडी” नावाची एक फॉरेन फिल्मदेखील केलेली आहे. त्यानंतर मराठीत आलेल्या धुसर या सिनेमातही तिने आपल्या भुमिकेची चांगलीच छाप उमटवली होती. दीक्षा केतकर नेहमी एखाद्या नव्या चॅलेंजिंग भुमिकेसाठी तत्पर असल्याची पहायला मिळते. “सेफ जर्नीज नीती” या सिनेमातूनही तिने रसिकप्रेक्षकांना आपल्या भुमिकेने अगदी सुन्न करून सोडल्याचं पहायला मिळालं होतं.
दीक्षा केतकर बद्दल ही माहिती तर अगदीच साधी आहे असं म्हणावं लागेल कारण दीक्षा ही मराठीमधील अशी अभिनेत्री आहे जिने या देशाचं नाव चक्क न्यू यॉर्क सारख्या ठिकाणी आपल्या नाटकाचे प्रयोग करून उंचावल आहे. आणि जगातील सर्वाधिक मोठ्या ठिकाणी आपल्या नाटकाचे प्रयोग यशस्वीरित्या पार पाडून दाखवणारी ती एक अभिनेत्री आहे असं म्हणावं लागेल. पुण्यात जन्मलेल्या, वाढलेल्या आणि लहानपणापासूनच नाटकांची आवड असलेल्या दीक्षाने उच्चशिक्षणाकरता न्यू यॉर्क गाठलं. आणि तिथे तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर अगदी अनेकांना सुन्न करून सोडलं. खरतरं भारतीय सिनेमाक्षेत्रात विविध प्रकारचे प्रयोग करणारे कलाकार, दिग्दर्शक यांची फार गरज आहे. आणि निश्चितच जर हळूहळू दीक्षासारखे कलाकार सिनेसृष्टीत येत असतील तर सर्वांगाने सिनेसृष्टी भविष्यात अधिक बहरेल यात काहीच शंका नाही.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!