श्रद्धा कपूर ही बॉलिवूडची एक मोठी, प्रसिद्ध आणि नावाजलेली अभिनेत्री आहे आणि आजच्या काळात सर्वचजण श्रद्धाला बॉलिवूडमध्ये खूप चांगल ओळखतात. कारण श्रद्धा कपूरने तिच्या आयुष्यातील अनेक वर्षे बॉलिवूडला दिली आहेत आणि या वर्षांत श्रद्धाने बॉलिवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

श्रद्धा कपूरच्या फिल्मी करिअरची सुरुवात 2011 मध्ये तीन पत्ती या सिनेमातून झाली. त्यानंतर श्रद्धाने बॉलिवूडला साहू, छिछोरे, स्त्री आणि इतर अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आणि याचेच परिणाम म्हणजे आजच्या काळात श्रद्धा कपूरचे बॉलिवूडमध्ये खूप मोठे नाव आहे.

सध्याच्या काळात श्रद्धा कपूरचा सोशल मीडियावर चांगलाच बोलबाला होत असल्याच दिसून येत आहे. हे इतर कोणत्याही कारणामुळे नाही तर तिच्या काही विधानांमुळे आहे. पहिलं विधान आहे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता टायगर श्रॉफचं.

टायगरने हल्लीच असे वक्तव्य केले आहे, ज्यामुळे श्रद्धा कपूर फारच आश्चर्यचकित झाली आहे. ज्यानंतर श्रद्धा म्हणाली की, जर मला आधी माहीत असते तर…  टायगरच्या या विधानाने श्रद्धा कपूरला नेमके काय आणि का आश्चर्य वाटले, याबद्दल आम्ही तुम्हाला या लेखात पुढे सांगणार आहोत…!

टायगर श्रॉफला श्रद्धा आवडायची, त्याने हे स्वतः सर्वांसमोर सांगितले: आपण सर्वजण श्रद्धा कपूरला चांगले ओळखतो. याचे कारण म्हणजे श्रद्धा कपूर ही सामान्य व्यक्ती नसून बॉलीवूडची खूप मोठी आणि सुंदर अभिनेत्री आहे. सध्या सोशल मीडियावर सर्वत्र श्रद्धा कपूरच्या चर्चा रंगल्या आहेत आणि ते देखील अभिनेता टायगर श्रॉफमुळे. कारण नुकतेच टायगर श्रॉफने श्रद्धाबाबत मोठे वक्तव्य केले आहे. टायगरने आपल्या वक्तव्यात सांगितले की, त्याला लहानपणापासूनच श्रद्धा आवडते.

टायगरने सांगितले की, त्याला लहानपणापासूनच श्रद्धा कपूरवर प्रचंड क्रश होता. टायगरचे हे वक्तव्य जेव्हा श्रद्धा कपूरने ऐकले तेव्हा तिला धक्काच बसला. यानंतर श्रद्धा कपूरनेही टायगरवर मोठे वक्तव्य केले आहे. श्रद्धाने तिच्या वक्तव्यात असे म्हटले आहे की, जर मला आधीच माहिती असते, आणि हे मला आधी कळले असते तर कदाचित काही घडले असते पण आता मात्र या बद्दल काहीही होऊ शकत नाही, असे श्रद्धा म्हणाली. कारण सध्या श्रद्धा कपूर रोहन श्रेष्ठ नावाच्या एका व्यक्तीला डेट करत आहे.