बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही दररोज तिच्या काही ना काही वक्तव्यांमुळे चर्चेत येतच असते. कंगना ही चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध आणि यशस्वी अभिनेत्री आहे. तिच्या अनेक चाहत्यांना कंगनाच्या अभिनयाचे अक्षरशः वेड लागले आहे.

कंगना बॉलिवूडची क्वीन असण्यासोबतच सध्या ती कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून देखील ओळखली जात आहे. ही अभिनेत्री येणाऱ्या प्रत्येक दिवस तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत असते. यावेळी देखील असेच काहीसे पाहायला मिळत आहे, जिथे कंगना प्रसिद्ध अभिनेता हृतिक रोशनबद्दल खुलेपणाने बोलत आहे आणि अनेक मोठे खुलासेही करत आहे.

2013-14 मध्ये या दोघांच्या नात्याची खूप चर्चा झाली होती. 2013 मध्ये रिलीज झालेल्या ‘क्रिश 3’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान हे दोन्ही कलाकार एकमेकांच्या जवळ आले होते. दोघांमधे चांगली मैत्री देखील झाली होती. त्यानंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. कंगनाने खुलासा केला की हृतिक तिला फॉलो करत असे. जेणेकरून ती त्याच्याशी डेटिंग करण्यासाठी ‘हो’ म्हणेल.

ज्यानंतर कंगना ने देखील त्याला हो म्हणले होते आणि ते दोघेही एकमेकांना डेट करायला लागले होते. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोन्ही कलाकार एकमेकांसोबत जास्त वेळ घालवत असत. त्‍यामुळे 2014 मध्‍ये सुझैनसोबत घटस्‍फोट झाल्यानंतर चाहत्‍यांनी कंगनाला दोष दिला होता. त्याच वेळी जेव्हा कंगना अभिनेता हृतिकसोबत लग्नाची स्वप्ने रंगवत होती. त्यानंतर हृतिकने तिचे स्वप्न तोडले आणि तिच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि तिच्यापासून वेगळा झाला.

त्यानंतर कंगनाने सांगितले की, तिच्या वाढदिवशी हृतिक जमिनीवर पडून पडून डान्स करत असायचा. यासोबतच कंगनाने हृतिकवर आरोप केला होता की, तो तिला वेड सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असायचा. त्यामुळे हे नाते व्यवस्थित आणि आरामशीर पुढे नेण्यासाठी काही लोकांकडून धमक्याही दिल्या जात होत्या.

कंगनाने खुलासा केला की प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी तिला हृतिकची माफी मागण्यास आणि संबंध शांत ठेवण्यास सांगितले होते. त्यामुळे कंगना आणि जावेद अख्तर यांच्यात वाद झाला. कंगनाचे एकामागोमाग असलेले हे खुलासे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का देत आहे.

कंगना राणौतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच तिच्या नवीन शो ‘लॉकअप’मध्ये दिसणार आहे. या शोमध्ये 16 हायप्रोफाईल लोकांना लॉकअपमध्ये बंद करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला त्याच्या आयुष्यातील काही कटू सत्य सर्वांसमोर सांगावे लागेल. कंगनाच्या या शोची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.