Ti Ani Itar – ‘ती आणि इतर’ साठी सचिन पिळगावकर बनले गजलकार ‘शफक’

1118

‘ती आणि इतर’ साठी सचिन पिळगावकर बनले गजलकार ‘शफक’ 

मराठी चित्रपटसृष्टीतले अष्टपैलु व्यक्तिमत्व असलेले ज्येष्ठ कलाकार सचिन पिळगावकर प्रथमच ‘कवी’ च्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येत आहे! अभिनेता, दिग्दर्शक, नृत्यदिग्दर्शक, गायक आणि निर्माता अशा चित्रपटसृष्टीच्या विविध कक्षा पडताळून पाहणारे सचिनजी आता Ti Ani Itar ‘ती आणि इतर’ या आगामी सिनेमाचे गजलकार म्हणून लोकांसमोर येत आहे. हिंदी दिग्दर्शक गोविंद निहालाणी दिग्दर्शित या सिनेमासाठी ‘शफक’ या टोपण नावाने त्यांनी गजल लिहिली आहे. ‘बादल जो घीर के आये’ असे या गजलचे उर्दू बोल असून,  संगीतकार वसुदा शर्मा दिग्दर्शित हि गजल अदिती पौल यांनी गायले आहे. सिनेमातील ह्या गझलमुळे सचिन यांना ‘गझल कवी ‘शफक’ अशी देखील ओळख लवकरच मिळणार आहे. तसेच या सिनेमात मंदार चोळकर लिखित आणि वसुदा शर्मा संगीतदिग्दर्शित ‘आतुर मन’ हे गाणेदेखील यात असणार आहे. गायिका अंकिता जोशीचा आवाज लाभलेले हे गाणे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ठरणार आहे.
सायलेन्स इस नॉट अन ऑप्शन…’ (गप्पं बसणं हा काही पर्याय नाही होऊ शकत) या मथळ्याला अधोरेखित करणारा Ti Ani Itar ती आणि इतर हा सिनेमा २१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. स्त्री समस्येवर भाष्य करणाऱ्या ह्या चित्रपटात सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. 
हिमांशू ठाकूर प्रस्तुत या चित्रपटाची प्रकाश तिवारी, पुनीत सिंह, दयाल निहालाणी आणि धनंजय सिंह या तिकडींनी निर्मिती केली असून, मंजुळा पद्मनाभन यांच्या इंग्रजी नाटक ‘लाईटस् आऊट’ वर हा सिनेमा आधारित आहे. तसेच प्रसिद्ध स्त्रीवादी विचारधारेतील लेखिका शांता गोखले यांनी या सिनेमाची पटकथा आणि संवाद लिहिली आहे. या सिनेमात अमृता सुभाष, अविष्कार दारव्हेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे सुमन पटेल आणि गणेश यादव  हे कलाकार देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत.