Aanandi Wins Everyones Hearts On The Set Of Balpan Dega Deva

1246

बालपण देगा देवाच्या सेटवर आनंदीनी जिंकली सगळ्यांची मनं!

लहान मुलांच्या निरागस वागण्यानेबोलण्याने कधी आपल्याला लळा लावतील हे सांगता येत नाही. त्यांचा अवतीभवती असलेला वावरत्यांचे कधी न संपणारे प्रश्ननिरागसता आणि लाघवी बोलणे कधी समोरच्याला त्यांच्या प्रेमात पाडतील हे कळणे कठीणच. त्यांच्या आजूबाजूला असण्याने आणि त्यांच्या निखळ हसण्यानेच मुळी आपण आपली सगळी दु:ख क्षणात विसरून जातो. कलर्स मराठीवर सुरु असलेल्या Balpan Dega Deva बालपण देगा देवा या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका साकरणारी आनंदी म्हणजेच मैथिली पटवर्धन सेटवर सगळ्यांची लाडकी झाली आहे. काही दिवसांमध्येच तिने सगळ्यांना आपलेसे केले आहे. मालिके प्रमाणेच ती सेटवर देखील सगळ्यांना अनेक प्रश्न विचारतेगप्पा मारतेतिचा सेटवर कुठल्याही प्रकारचा त्रास नसतो. मालिकेमध्ये असलेल्या मुलांबरोबर खेळते तसेच सेटवर ती जेंव्हा वेळ मिळेल तेंव्हा अभ्यास देखील करते. तिच्या अश्या वागण्याने संपूर्ण सेटवर खेळीमेळीचे वातावरण असते.

 मैथिली ठाण्यामधील सरस्वती विद्यालयामध्ये शिकत असून ती चौथीमध्ये आहे. शाळा आणि मालिकेचे शुटींग या दोन्ही गोष्टींमध्ये ती कसा समतोल राखते हे विशेष. तिला तिच्या अभ्यासाबद्दल विचारले असता ती म्हणालीतिच्याबरोबर तिची आई सेटवर जातीने हजर असते आणि आईचं तिचा नियमित अभ्यास घेते. मिलिंद शिंदेभाग्यश्री राणे यांच्या देखील आनंदी लाडकी बनली आहे. मालिकेतील नयनतारा म्हणजे भाग्यश्री राणे हिच्यासोबत तर मैथिलीचे खास नाते तयार झाले आहे. मेकअप रूममध्ये ENO गेम असो वा जेवण करणे असो वा झोपणे असो भाग्यश्री मावशी शिवाय तिचे पानदेखील हलत नाही. मैथिली अतिशय गोडं आणि लाघवी मुलगी आहे असं तिने सांगितले. मालिकेमध्ये अण्णाचा रोल साकरणारे ज्येष्ठ कलाकार विक्रम गोखले देखील मैथिलीच्या नियमित अभ्यास करण्याचे कौतुक करतात ती मोबाईलवर गेम खेळण्यापेक्षा अभ्यास करतेती खुप हुशारशहाणी मुलगी आहे असे ते म्हणाले. काही दिवसांमध्यच ती आपली लाडकी नात झाली आहे असे देखील ते आवर्जून म्हणाले. सेटवर अगदी आजोबा नातीची जशी काळजी घेतील अशी अण्णा मैथिलीची काळजी घेतात आणि शिस्त देखील लावतात.