हिंदी सिनेमा च्या जगात असे अनेक नामांकित स्टार जोड्या आहेत ज्यांनी आपले जोडीदार फिल्म इंडस्ट्री मधीलच निवडले. या फिल्मस्टार्स पैकी काहीे असे आहेत ज्यांचे पाहिले लग्नं अयशस्वी झाले, म्हणून त्यांनी दुसरे लग्न केले. आणि काही असेही लोक आहेत ज्यांचे लग्न झाल्यावर ते दुसरीच्या प्रेमात पडले आणि मुले असूनही पहिल्या पत्नी ला सोडले. परंतु त्यांच्या दुसऱ्या पत्नीला काही आपत्य होऊ शकले नाही. अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या वैद्यकीय कारणांमुळे आई होऊ शकल्या नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बॉलिवूड सेलिब्रिटी जोड्यांविषयी सांगणार आहोत.
दिलीपकुमार-सायरा बानो : 50 आणि 60 च्या दशकात दिलीप कुमार बॉलीवूडमधील मोस्ट एलिजिबल बैचलर्सं पैकी एक होता. सुरुवातीला तो मधुबालासोबत होता, परंतु मधुबालाशी ब्रेकअप झाल्यानंतर त्याची भेट सायरा बानोशी झाली.त्यावेळी सायरा बानो बॉलिवूड मधे नवीन होती. सायरा बानूने वयाची पर्वा न करता तिच्या पेक्षा 22 वर्षांनी वयस्कर असलेला दिलीप कुमारशी लग्न केले. सायरा बानोचा हाय ब्लडप्रेशर मुळे गर्भपात झाला होता आणि त्यानंतर ती कधीच आई होऊ शकली नाही.
मीना कुमारी-कमल अमरोही : प्रसिद्ध दिग्दर्शक कमल अमरोही आणि रुपेरी पडद्यावरील ट्राजेडी क्वीन मीना कुमारी या दोघांची प्रेम कहाणी बॉलिवूड मध्ये खुप प्रसिद्ध झाली होती. ते सेटवर भेटले आणि तिथूनच प्रेम वाढू लागले. त्यांच्या वयात 15 वर्षांचा फरक होता कारण कमल हा मीनापेक्षा 15 वर्षांनी मोठे होते. आणि विवाहित असून त्यांना मुलेही होती. असे म्हणतात की, लग्नानंतर मुले जन्मालाच घालायची नाहीत या अटीवरच कमलने मीना कुमारीशी लग्न केले होते. लग्नानंतर दोघांमध्ये तणाव वाढू लागला आणि एक वेळ अशी आली की ती एकाकीपणात राहून दारूच्या आहारी गेली. मीना कुमारी यांचे 1972 मध्ये लिवर सोरायसिसमुळे निधन झाले.
साधना-आर के नैय्यर : बॉलिवूडमधील प्रसिद्ध सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत-साधना शिवदासानी आणि आर के नय्यर यांचे देखिल नाव आहे, हे त्यांच्या काळातील खूप प्रसिद्ध रोमँटिक जोडपे होते. दोघांनी 1966 मध्ये लग्न केले होते आणि हिंदी चित्रपटात साधना हे नाव, त्याकाळी खुप मोठे होते आणि नैय्यर साहेब हे इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक होते. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते पण काही तांत्रिक कारणांमुळे साधनाला मुलंबाळं होऊ शकले नाहीत.
आशा भोसले-आरडी बर्मन : सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले आणि संगीत दिग्दर्शक आरडी बर्मन यांनाही मुले नाहीत. तथापि आशाचे पहिले लग्न गणपतराव भोसले यांच्याशी झाले होते. या लग्नापासून त्यांना 3 मुले आहेत. पण लग्नाच्या 11 वर्षानंतर दोघे वेगळे झाले आणि 1980 मध्ये आशाजींनी आरडी बर्मनशी लग्न केले. पण त्यांना मुल झाल नाही.
मधुबाला – किशोर कुमार : बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक असलेल्या मधुबालाचे अनेक दीवाने होते. प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचे चाहते होते. तर किशोर कुमार सर्वांनाच प्रिय होते. दोघांनी 1960 मध्ये लग्न केले होते. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. मधुबालाचे हे किशोर दा सोबतचे दुसरे लग्न होते आणि पहिल्या लग्नापासून तिला एक मुलगा होता. किशोर दाचे मधुबालाशी लग्न झाले होते, काही काळानंतर तिला हृदयविकाराचा त्रास झाला आणि डॉक्टरांनी तिला गर्भधारणा न करण्याचा सल्ला दिला. 1969 मध्ये मधुबाला चे निधन झाले.
शबाना आझमी-जावेद अख्तर : संपूर्ण इंडस्ट्रीला जावेद अख्तर आणि शबाना आझमीची प्रेमकथा माहित आहे. तसे, जावेदने 1972 मध्ये अभिनेत्री हनी इराणीशी प्रथम लग्न केले होते. ज्यांच्या पासुन फरहान आणि झोया अशी दोन मुलं होती. जावेद शबानाच्या प्रेमात पडला आणि तिच्याशी लग्न केले. पण त्यांना मूल झाले नाही. तथापि, शबाना मात्र जावेदच्या दोन्ही मुलांना आपले मानते आणि त्यांच्या वर आईप्रमाणे प्रेम करते.
अनुपम खेर-किरण खेर : अनुपम खेर आणि किरणची पहिल्यांदा 80 च्या दशकात चंदीगडमध्ये भेट झाली. त्यावेळी किरणचे लग्न झाले होते आणि ती एका मुलाची आई होती. पण तिचा, तिच्या पतीशी मतभेद होते. या दरम्यान, तिचे आणि अनुपमचे प्रेम जुळले व अनुपम खेर आणि किरण या दोघांचे लग्नही झाले, त्यानंतर दोघे मुंबईत आले. असे म्हणतात की दोघांनाही मुले हवी होती परंतु वैद्यकीय कारणांमुळे त्यांनी मुले न होऊ देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अनुपम खेर यांनी किरणचा मुलगा सिकंदरला स्वतःचे आडनाव दिले.
संगीता बिजलानी – मोहम्मद अझरुद्दीन : एकेकाळी सलमान खानबरोबर रिलेशनमध्ये असलेल्या संगीता बिजलानीचे लग्न टीम इंडियाचे माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनशी झाले होते. संगीता एक मॉडेल आणि अभिनेत्री होती. संगिता बिजलानी आणि मोहम्मद अजहरुद्दीन दोघे 90 च्या दशकात भेटले, आणि अझरुद्दीनने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला आणि 1996 मध्ये संगीताशी लग्न केले. अझरला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत पण संगीताला स्वत: ची मुले नाहीत.