थंडीचे दिवस जवळ आले की आरोग्यासंबंधित विविध समस्या उद्भवण्यास सुरुवात होते. मात्र या दिवसात आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही उपाय केले जातात. खासकरुन स्निग्ध पदार्थांचा अधिक वापर या दिवस केल्याचे दिसून येते. तर थंडीत शेंगदाणे खाण्याचे फायदे असून त्यामधून आपल्या शरीराला प्रोटीन, ओमेगा-3,ओमेगा-6, फायबर आणि विटामिन ई सारखे तत्व मिळतात मिळतात.

हे सर्व तत्व आपल्या आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरत थंडीच्या दिवसात शरीरात उब कायम राहण्यास ही मदत करतात.

शेंगदाण्यात प्रोटीन अधिक असल्याने ते शारिरीक वृद्धीसाठी उपयुक्त ठरते. तसेच जर तुम्हाला दूध पिणे बहुधा पसंद नसल्यास शेंगदाणे हा त्याऐवजी उत्तम पर्याय आहे. शेंगदाण्यांमधून पोषक तत्वांसोबतच हृदयासंबंधित होणारे आजार कमी होतात.

 

मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलिसॅच्युरेडेट फॅट शेंगदाण्यात असल्याने त्याचा हृदयासाठी फायदा होतो. शरीरामधील हानिकारक कॉलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. त्याचसोबत मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी सुद्धा शेंगदाणे आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी शेंगदाणे खाल्ल्यास त्यांच्या रक्तामधील साखरेचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी मदत होते.

त्याचसोबत शेंगदाण्यात भरपूर प्रमाणात फॅट जरी असले तरीही वजन कमी करण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या प्रोटीन आणि फायबर मुळे वजन कमी होते. त्याचसोबत शेंगदाणे खाल्ल्याने पोट भरल्यासारखे वाटते. गर्भवती महिलांनी शेंगदाणे खाणे फायद्याचे मानले जात असून त्यामध्ये फोलेट नावाचे तत्व असून ते शरीरातील पेशींचे विभाजन करण्यास मदत करतात.

त्वचेच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे ओमेगा-6 फॅटी ऍसिड हा घटक शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात असतो. त्यामुळे शेंगदाणे खाणे हे त्वचेसाठी उत्तम मानले जातात.

शेंगदाण्याचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास पचनशक्ती वाढते आणि भूक न लागण्याची समस्याही दूर होते. शेंगदाण्यामध्ये ओमेगा-६ फॅटसुद्धा भरपूर प्रमाणात आढळतात. चांगल्या त्वचेसाठी ते अत्यंत फायदेशीर आहेत. त्यामुळेच शेंगदाणे त्वचेसाठी उत्तम मानले जातात.

शेंगदाणे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज योग्य प्रमाणात शेंगदाणे खाणे शरीरासाठी उपयुक्त आहे. शेंगदाण्याचे जसे काही फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहे. अतिप्रमाणात शेंगदाण्याचं सेवन केल्यास ते शरिरासाठी धोकादायक ठरू शकतं. जास्त शेंगदाणे खाल्ल्यास पित्ताचा त्रास होऊ शकतो.

काही जणांना शेंगदाणे खाण्यामुळे पित्ताचा किंवा ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. विशेषतः लाल शेंगदाणे खाण्यामुळे पित्त वाढू शकते. पित्ताचा त्रास किंवा दमा असणाऱ्यानी शेंगदाणे खाऊ नयेत.

वरील लेखमधील दिलेले उपाय आपल्यासाठी योग्य असतीलच असे नाही, कोणताही उपाय करण्या अगोदर आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.