बॉलिवुड सिनेसृष्टीत अनेकदा काही कलाकार आपल्याला एक दोन सिनेमे अथवा कधीकधी तर काही कलाकार काही स्क्रीनटाईमवर झळकण्यापुरते पहायला भेटतात आणि नंतर थेट त्यांच आस्तित्वच सिनेमांमधून गायब झाल्याच पहायला मिळतं. तर मुळात अशाच काही खास अभिनेत्री आहेत ज्यांनी चक्क आजच्या घडीचा सुपरस्टार अक्षय कुमार याच्यासोबत सिनेमे केले आणि नंतर मात्र त्या अभिनेत्र्या सिनेमातूनच गायब झाल्या. चला तर मग आपण जाणून घेऊयात कोण आहेत या ठराविक अभिनेत्री?
सर्वप्रथम बोलायचं म्हटलं तर शांतिप्रिया. अर्थात शांतिप्रिया ही चक्क अक्षय कुमारच्या पहिल्या सिनेमाची अभिनेत्री होती. तिने सौगंध या सिनेमात अक्षयसोबत नायिकेची भुमिका वठवली होती. या सिनेमानंतर सिद्धार्थ रे यांच्यासोबत शांतिप्रियाने लग्न केलं. परंतु तिच्या पदरात दोन मुलांना ठेवून सिद्धार्थ रे मृत्युमुखी पडले. आज शांतिप्रिया सिनेमा सोडून मुलांचा सांभाळ करत आपलं आयुष्य जगत आहे.
यानंतर म्हटलं तर आयेशा जुल्का ही अभिनेत्री. आयेशा जुल्का ला आजही तमाम रसिकप्रेक्षक चांगलाच ओळखतो. वक्त है हमारा, दिल की बाजी, जय किशन, खिलाडी यांसारख्या सिनेमांमधून तिने अक्षय कुमारसोबत चांगल्या भुमिका पार पाडल्या. अक्षय आणि आयेशा यांच्या त्या काळी प्रेमप्रकरणांच्या चर्चांना प्रचंड उधाण आलेलं पहायला मिळालं होतं. आज आयेशा सिनेसृष्टीपासून बऱ्यापैकी दुरच राहिल्याची पहायला मिळते. आयेशा स्वत: एक स्पा बिझनेस चालवताना पहायला मिळते. तिचा नवरादेखील एक कन्स्ट्रक्शन टायकून आहे.
यानंतर येणारी अभिनेत्री म्हणजे, आश्विनी भावे. मराठी सिनेसृष्टीतलं हे नाव फार लक्षात राहणारं आणि तमाम रसिकप्रेक्षकांची ही लाडकी अभिनेत्री आहे. आज आश्विनी भावे अमेरिकेत आपल्या पतीबरोबर जीवण जगताना पहायला मिळते आहे. आश्विनी भावे हिनेदेखील बऱ्याच अवधीपासून बॉलीवुडला रामराम ठोकला आहे. जख्मी दिल, सैनिक यांसारखे सिनेमे तिने अक्षय कुमार याच्यासोबत केलेले होते. दोघांची जोडी त्या काळी प्रचंड हिट झाली होती.
यानंतर येणारी अभिनेत्री म्हणालं तर ती आहे मधू. अर्थात मधू म्हटलं की तिचा अजय देवगण याच्यासोबतचा फुल और कांटे हा सिनेमा पहिले डोळ्यांसमोर येतो. एलान, हम है बेमिसाल, यांसारख्या सिनेमांमधून ती अक्षय कुमारसोबत झळकली होती. आज मधू तिच्या सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. परंतु तिने सिनेसृष्टीत तरी अजून कुठलही पुर्नपदार्पण केलेलं नाही.
यानंतर येणारी अभिनेत्री म्हणजे चांदनी. चांदनी आणि अक्षय कुमार यांची जोडी जय किशन आणि इक्के पे इक्का मधे एकत्रीत आली होती. सनम बेवफा सारखा दर्जेदार सिनेमा दिलेली ही अभिनेत्री अचानक सिनेसृष्टीतून दिसेनाशी झाली. आज तिच्याबद्दल खास अशी माहिती अनेकांना नाही. परंतु ती अमेरिकेत एक नृत्यशिक्षिका असल्याची खबर आहे. शिल्पा शिरोडकर हे नाव आजही अधूनमधून बऱ्याचदा चर्चेत असल्याच तुम्ही ऐकत असता. नव्वदीच्या दशकातली शिल्पा प्रचंड लोकप्रिय अभिनेत्री होती. अक्षय कुमार याच्या हम है बेमिसाल या सिनेमात ती पहायला मिळाली होती. याशिवाय शिल्पाने अनेक मालिकांमधे काम केलेलं आहे. आज शिल्पा तिच्या कुटुंबासोबत दुबईत राहत असल्याची पहायला मिळते.
यापुढे ज्या अभिनेत्रीचं नाव घ्यायचं आहे ती म्हणजे, ममता कुलकर्णी. नव्वदीच्या दशकातली जवळपास सर्वाधिक बोल्ड अभिनेत्रींपैकी ही अभिनेत्री अधिक चर्चेत राहत होती. तिचा अभिनय आणि तिच्या अभिनयाच्या विविध छटांनी तिने तमाम रसिकप्रेक्षकांची मन जिंकली होती. सबसे बडा खिलाडी, वक्त है हमारा, अशांत यांसारख्या सिनेमांमधून तिने अक्षय कुमारसोबबत एकत्र काम केलं होतं. ममता कुलकर्णी कायमच तिच्यावर निर्माण झालेल्या वादंगांच्या प्रसंगामुळे चर्चेत राहिली. २००३ नंतरपासून ती सिनेसृष्टीतुन अचानक गायब झाली. सध्या ती केनियात राहत असल्याची माहिती ऐकायला मिळते.
वर्षा उसगावकर हे नाव ऐकलं म्हणजे मराठी सिनेसृष्टीतली जबरदस्त आणि भन्नाट अभिनेत्रीचा चेहरा थेट डोळ्यांसमोर उभा राहतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण वर्षा उसगावकर हिने अक्षय कुमार याच्यासोबत हत्या हा हिंदी सिनेमा केला होता, शिवाय तिने हिंदी सिनेसृष्टीत काम करत आपली छाप रसिकप्रेक्षकांवर पाडली होती. परंतु २००४ नंतर तिने हिंदी चित्रपटात काम करणं बंद केल्याच पहायला मिळालं आहे. आज मराठी मालिकांमधे वर्षा बखुबीने काम करताना पहायला मिळते.
यानंतर येणारी अभिनेत्री म्हणजे, रंभा. रंभादेखील आज सिनेसृष्टीपासून दूर असल्याची पहायला मिळते. एके काळी हिंदी सिनेसृष्टीत तिने आपला चांगलाच दबदबा निर्माण केला होता. “जानी दुश्मन: एक अनोखी कहानी” या सिनेमातून अक्षय कुमार व रंभा ही जोडी एकत्र आली होती. रंभा लग्न झाल्यानंतर फारशी हिंदी सिनेसृष्टीत काम करताना पहायला नाही मिळाली. परंतु त्यानंतर तिने थोडेफार दाक्षिणात्य सिनेमे व मालिका केल्याचं पहायला मिळतं.
आरती छाबड़िया, या नावाशी अनेकजण परिचीत असतील. आवारा पागल दिवाना सारखा भन्नाट विनोदी सिनेमा या अभिनेत्रीनेही चांगलाच गाजवला. परंतु दुर्दैवाने ती बॉलीवुडमधे फारशी चांगली प्रगती नाही करू शकली. आणि तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. सध्याच्या घडीला आरती ऑस्ट्रेलियात सेटल झाल्याची पहायला मिळते आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!