सध्या करोनाकाळात अनेक क्षेत्रांना फार मोठ्या प्रमाणावर फटका बसल्याच पहायला मिळतं आहे. अशातच सिनेसृष्टीची अवस्था ही काही इतर क्षेत्रांपेक्षा वेगळी नाही. त्यातही आज अनेक ज्युनियर म्हणून काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर कमाईची एक टांगती तलवार लटकू लागली आहे.
आणि केवळ ज्युनियरचं नाही तर काही सिनियर आणि उत्तम अशा कलाकारांवरदेखील करोनाने गंभीर प्रसंगाची वेळ आणलेली पहायला मिळते आहे. तर मुळात अशीच बाब सध्याला तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेतील एका कलाकारासोबत घडलेली पहायला मिळते आहे. “घनशाम नायक” यांना आजवर तुम्ही एका थोडसं विनोदी आणि हरहुन्नरी पात्र असलेल्या “नट्टू काका” या भुमिकेमधून पाहिलं आहे.
तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेतील जेठालाल या पात्राच्या दुकानात काम करणारे हे नट्टू काका. त्यांच्या पात्राचा स्वभाव अनेकदा अगदी जसाश तसे उत्तरं देऊन मोकळे होणारे, असाही मालिकेतील अनेक प्रसंगातून दिसून येतो. मुळात सध्याच्या घडीला या नट्टू काकांवर अर्थात अभिनेते घनशाम नायक यांच्यावर गंभीर स्वरूपाची वेळ आल्याच समजतं आहे.
ते गेल्या महिन्याभरापासून बेरोजगार होऊन घरी बसले असल्याचं समजतं आहे. घनशाम नायक फारच चिंतेत सध्याचा काळ घालवत आहेत, तारक मेहता का उलटा चश्मा या मालिकेत त्यांच्या भुमिकेची वेळ आता कधी येईल? यावरून त्यांना फार चिंता लागली आहे. शेवटचा एपिसोड केल्यानंतर पुढील तब्बल एक महिना उलटला तरी आपल्याला अजूनही काम मिळालं नाहीये, ही भावना त्यांना सतावत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे.
सध्याच्या घडीला महाराष्ट्रातील वाढत्या करोनाच्या केसेसमुळे महाराष्ट्र सरकारने शुटींगसाठी परवानगी रद्द केली आहे. त्यामुळे अनेक मालिका सध्या बंद झाल्या आहेत. आणि या मालिकांच्या बंद असल्याने अनेक कलाकारांचे हार होताना पहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील काही मालिका या इतर राज्यात जाऊन आता नव्याने शुटींगसाठी सज्ज झाल्याच्या पहायला मिळत आहेत.
परंतु काही ठराविक मालिकांच्या मुंबईत असलेल्या सेटची इतर राज्यात ने आणं करणं शक्य होणार नसल्याने त्या मालिकांच्या निर्मात्यांनी त्या बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या घडीला घनशाम नायक फारच चिंतेत असून अडचणीतून जात असल्याची माहिती त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाला नुकतीच दिली आहे. घनशाम नायक हेदेखील म्हटले की, मालिकेच्या निर्मात्यांकडून त्यांना पुढच्या गोष्टीची अजुनही खबर देण्यात आलेली नाही. किंवा पुढे आता नेमकं कधी त्यांची भुमिका मालिकेत असेल याचीही काहीच माहिती त्यांना मिळालेली नाही.
घनशाम नायक म्हणतात की, त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, त्यांच कुटुंब वारंवार त्यांना त्यांच्या कामाचं काय हे प्रश्न विचारत आहेत, आणि काम नसल्याने ते महिनाभरापासून घराबाहेर पडलेच नाहीयेत. अशा कठीण परिस्थितीत घरी वेळही जात नाही आणि मन स्वत:लाच खात राहतं, अशी अवस्था त्यांची झालेली पहायला मिळते आहे.
सिनियर्सनी अर्थात ज्येष्ठांनी एक्टींग करण्यात शक्यतो आवश्यक ती काळजी घेतल्याच गेली पाहिजे हे मी समजू शकतो, परंतु कलाकाराला जर त्याच्या हक्काचं कामच करता येत नाहीये तर खुप अवघडं गोष्ट आहे. घनशाम नायक यांच्या गळ्याची गेल्या वर्षीच सर्जरी झालेली आहे. त्यासाठी त्यांना दवाखान्यात चांगलाच पैसा खर्च करावा लागला होता. शिवाय कुटुंबातील इतरही जबाबदार्या असल्याने ते आता प्रचंड पेचात अडकल्याचे पहायला मिळतं आहेत.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!