बॉलिवुडमधे आज एका वेगळ्या उंचीवर पोहचत, आपल्या अभिनयाची छाप पाडून चांगली कामगिरी बजावणारी एक अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा. अनुष्का शर्माचा आजवरचा हिंदी सिनेसृष्टीतील प्रवास अविस्मरणीय आणि वारंवार अधिकच रोचक स्वरूपाचा राहिला असल्याचं आजवर आपण रसिकप्रेक्षकांनी पाहिलंच आहे. आणि त्याचमुळे अनुष्का शर्मा नेहमीच लाईमलाईटच्या दुनियेत एक चर्चेतला विषय बनून कायम प्रकाशात राहिली आहे.

आता सध्याचच उदाहरण घ्यायचं म्हटलं तर एका जुन्या व्हिडिओच्या निम्मिताने ती पुन्हा सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेचा विषय ठरू लागली आहे. चला तर आता ही बात नेमकी काय आहे, हे जाणून घेऊयात. तर मुद्दा असा आहे की, आमिर खानचा 3 इडियट्स हा सिनेमा प्रचंड गाजला. यातील एकूण एक पात्र त्याची भुमिका, या सिनेमातील प्रत्येक पात्र आणि त्यांचा वेगळेपणा आजही आपल्या मनावर अधिराज्य करतात.

तर याच सिनेमाकरता अनुष्का शर्मानेदेखील चक्क ऑडिशन दिल्याची बात आता समोर आली आहे. “मुन्नाभाई एमबीबीएस” या सिनेमातील संवाद ती या व्हिडिओमधे बोलताना दिसून येते आहे. खरतरं मुन्नाभाई एमबीबीएस, 3 इडियट्स हे प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांचेच सिनेमे आहेत. अनुष्का शर्माचा त्यावेळी जरी ऑडिशनचा व्हिडिओ थोडासा फेल गेला असला तरीदेखील तिला पुढे चालून पीके या सिनेमात काम करण्याची संधी राजकुमार हिराणी यांच्याकडून मिळालीच. विशेष बाब म्हणजे, या सिनेमातही आमिरच प्रमुख भुमिकेत होता.

सध्या अनुष्काच्या चाहत्यांना मात्र या तिच्या व्हायरलं होत असलेल्या ऑडिशन व्हिडिओने मात्र ठार वेडं करून सोडलं आहे, अशी स्थिती झालीये. या ऑडिशन व्हिडिओनंतर अनेकांनी तर अनुष्काला 3 इडियट्समधे करीनाच्या भुमिकेत ठेवून स्वप्नरंजनदेखील रंगवली आहेत.

अनुष्का तिच्या ऑडिशन व्हिडिओमधे जरी त्यावेळी हवं ते त्या पात्रासाठी देऊ शकली नव्हती तरीदेखील त्यानंतर अवघ्या काही वर्षातच तिने पीके सिनेमातून आपली छाप उत्कृष्टरित्या उमटवली. राजकुमार हिराणी हे हिंदी सिनेसृष्टीतील एक उत्कृष्ट दर्जाचे दिग्दर्शक आहेत. त्यांनी बनवलेले सिनेमे चिरकाळ रसिकप्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतील यात तिळमात्र शंका नाही.

अनुष्का शर्मा हिने दिलेल्या मुलाखतीच्या व्हिडिओमधे हिरव्या रंगाचा टॉप घालून ऑडिशन देत असल्याची पहायला मिळते. अनुष्का शर्मा हिने आजवर विविध सिनेमांमधून आणि विविध प्रोजेक्टमधे एक निर्माती म्हणूनही भुमिका पार पाडल्या आहेत. अनुष्का तिला आलेल्या भुमिकांना फार सहजरित्या हाताळते हे तिला पडद्यावर पाहतानाच लक्षात येऊन जातं. कसल्याही प्रकारची सिनेसृष्टीत ओळख वा स्वत:चा कुठलाही पाया नसताना आज ज्या पद्धतीने अनुष्काने सिनेसृष्टीत नाव कमावलं आहे, ते नेहमीच इतरांना प्रेरणा देणारं राहिलं आहे.

अनुष्का सध्यातरी गेल्या काही काळापासून सिनेसृष्टीपासून थोडीशी दूर आहे कारण तिने एका मुलीला जन्म दिला आहे. तिची मुलगी व्यवस्थितरित्या चांगली मोठी होईपर्यंत तरी अनुष्का सिनेसृष्टीत पुन्हा कधी पदार्पण करते, हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे. अनुष्काने 2017 सालात भारतीय क्रिकेटचा प्रसिद्ध चेहरा आणि कप्तानपदाची धुरा सांभाळणाऱ्या विराट कोहली याच्यासोबत लग्नगाठ बांधली.

अनुष्काने हिंदी सिनेसृष्टीत अनेक कलाकारांसोबत चांगल्या पद्धतीने काम केलेलं पहायला मिळतं. अनुष्काच्या पदार्पणाची लवकरच आस उराशी बाळगून असलेल्या चाहत्यांना तिच्या या व्हायरलं होत असलेल्या व्हिडिओने मात्र चांगलाच दिलासा दिला आहे. अनुष्का नेहमीच तिच्या कामात जीव ओतून ती भुमिका साकारत असल्याची आजवर पहायला मिळाली आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!