अभिनेता अजय देवगण आणि सैफ अली खानची प्रमुख भूमिका असलेला ‘तान्हाजी-द अनसंग वॉरिअर’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घोडदौड करत आहे. चित्रपटाची कमाई पावणेदोनशे कोटींच्या उंबरठ्यावर जाऊन पोहचली आहे. सिनेरसिकांचा तुफान प्रतिसाद या चित्रपटाला मिळत आहे. स्वराज्य सिंह तानाजी मालुसरे यांची शौर्यगाथा पाहून सगळेच थक्क होत आहेत. सध्या यशाच्या शिखरावर ‘तान्हाजी’ पोहचला आहे.

‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असून बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘तान्हाजी’ची घौडदौड सुरूच आहे. ‘तान्हाजी’ हा सिनेमा यंदाचा 100 कोटी क्लबमध्ये सामील झालेला पहिला सिनेमा आहे.

लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा आकडा पार करेल, असे दिसतेय. सिनेमातील प्रत्येक कलाकाराच्या भूमिकांना रसिकांनी पसंती दिली. सिनेमातील सोयराबाई या भूमिकेत झळकलेली अभिनेत्री इलाक्षी गुप्ताची भूमिका छोटी असली तरी लक्षवेधी ठरली.

 

सध्या ती कामातून मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करत व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. श्रीलंका येथे ती क्वॉलिटी टाईम एन्जॉय करते. तान्हाजी सिनेमामुळेच इलाक्षी प्रकाशझोतात आली. तिने याच सिनेमातून आपल्या करिअरची सुरूवात केली. ‘तान्हाजी’ हा इलाक्षीचा पहिला सिनेमा आहे.

सिनेमात रसिकांनी तिला मराठमोळ्या अंदाजात पाहिले आणि आता तिला अतिशय ग्लॅमरस अंदाजात पाहून तिच्यावर फिदा होताना दिसत आहे. जितकी चर्चा तिच्या ऑनस्क्रीन लूकची झाली तितकीच ऑफस्क्रीन लूकचीही होत आहे.

इलाक्षीने याअगोदर ‘कोल्ड लस्सी आणि चिकन मसाला’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे. या वेबसीरिजचे दिग्दर्शन प्रदीप सरकार यांनी केलं होतं. इलाक्षीने आपल्या कामाच्या जोरावर 2015 मध्ये मिसेस इंडिया ग्लोब ही पदवी मिळवली होती.

साध्या आणि पारंपरिक अंदाजात ती जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाजही रसिकांना तितकाच भावतो. त्यामुळे बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे आगामी काळात इतर अभिनेत्रींप्रमाणे इलाक्षीदेखील आपला सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि तसेच लक्षवेधी स्टाईल यामुळे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणार हे मात्र नक्की.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.