‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ प्रदर्शित होऊन दोन आठवडे झाले असून बॉक्स ऑफिसवर अजूनही ‘तान्हाजी’ची घौडदौड सुरूच आहे. ‘तान्हाजी’ हा सिनेमा यंदाचा 100 कोटी क्लबमध्ये सामील झालेला पहिला सिनेमा आहे. लवकरच हा सिनेमा 200 कोटींचा आकडा पार करेल, असे दिसतेय. अजय देवगण, सैफ अली खान, काजोल, शरद केळकर अशी तगडी स्टारकास्ट असलेला ‘तान्हाजी- द अनसंग वॉरियर’ हा आगामी सिनेमा सध्या जाम चर्चेत आहेत.

अजय देवगणने या चित्रपटात तानाजी मालुसरेंची भूमिका वठवली आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता शरद केळकर आहे. आज याच मराठमोळ्या अभिनेत्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

2005 मध्ये शरद यांनी किर्ती गायकवाडशी लग्न केले. किर्ती ही टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. किर्ती व शरद यांनी ‘सात फेरे’ या मालिकेत एकत्र काम केले होते. याच मालिकेच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम बहरले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांना किशा नावाची एक मुलगी आहे.

किर्तीने सात फेरे, छोटी बहू, ससूराल सिमर का या मालिकेत काम केले. नच बलिए या रिअ‍ॅलिटी डान्स शोमध्येही तिला आपण पाहिले आहे. शरद केळकर ची खऱ्या जीवनातील पत्नी दिसायला खूपच सुंदर आहे.

अभिनयात येण्यापूर्वी शरद जिममध्ये नोकरी करायचे, हे क्वचितच लोकांना ठाऊक असेल. शरदचे सुरुवातीचे शिक्षण ग्वालियरमध्ये झाले. तर इंदूरच्या प्रेस्टीज कॉलेजमधून त्यांनी एमबीए पूर्ण केले. एमबीए पूर्ण झाल्यानंतर शरद यांनी फिजिकल एज्युकेशनच्या क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.

या काळात शरद यांनी जिम इन्स्ट्रक्टर म्हणून काम केले. 2002 साली शरद ग्रेसिम मिस्टर इंडियाचा फायनलिस्ट ठरले. पण ते हा किताब जिंकू शकले नाही. मुंबईत आल्यानंतर शरद यांनी एका टेलिकॉम कंपनीत पार्ट टाइम जॉब सुरु केला. सोबतच एका जीममध्ये जिम इन्स्ट्रक्टर म्हणूनही काम केले. कामासोबतच ते मॉडेलिंगसुद्धा करु लागले होते.

2004 मध्ये शरद यांना छोट्या पडद्यावर संधी मिळाली. दूरदर्शनवर प्रसारित होणा-या ‘आक्रोश’या मालिकेद्वारे त्यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले. अनेक हिंदी रिअ‍ॅलिटी शोचा होस्ट म्हणूनही ते दिसले. कालांतराने हलचल, गोलियों की रासलीला रामलीला, हीरो, मोहनजोदारो, रॉकी हँडसम, इरादा आदी बॉलिवूडच्या सिनेमात ते झळकले.

प्रभासने साकारलेल्या बाहुबली या व्यक्तिरेखेला शरदने आवाज दिला आहे. आज शरद एक मोठा डबिंग आर्टिस्ट म्हणूनही ओळखला जातो.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.