प्रथमेश परबने नेहमीच त्याच्या भन्नाट अभिनयाने दर्जेदार चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. २०१९ मध्ये त्याच्या टकाटक या चित्रपटाने तर बॉक्स-ऑफिस गाजवलं. येत्या रविवारी झी टॉकीज वाहिनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर सादर होणार आहे. या चित्रपटातील गणेश बाबुराव ठोके हि व्यक्तिरेखा प्रथमेशसाठी खूप खास आहे. एखाद्या व्यक्तीवर प्रेम करण्यासाठी तुमच्याकडे जर कारण नसेल तर ते प्रेम जास्त घट्ट असतं असं टकाटक मधील गणेश बाबुराव ठोके या प्रथमेशच्या व्यक्तिरेखेचं म्हणणं आहे. चित्रपटात कोणतीही अपेक्षा न ठेवता गणेश हा मिनीच्या मागे खंबीर पणे उभा राहतो. एखाद्या व्यक्तीकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता त्याच्यावर प्रेम करणं आणि त्याच्या सोबत राहणं, हीच प्रथमेशची सुद्धा प्रेमाबद्दलची व्याख्या आहे.

लॉकडाऊनमध्ये प्रथमेशच्या चाहत्यांना गणेश बाबुराव ठोकेच्या स्टाईलमध्ये काय सल्ला देशील असं विचारल्यावर प्रथमेश म्हणाला, “गणेश बाबुराव ठोकेच्या वतीने मी माझ्या सगळ्या सिंगल मित्रांना सांगीन कि तुम्ही अजिबात काळजी करू नका, जिकडे कुठे तुमची मिनी असेल ती सुद्धा लॉकडाउन मध्ये अडकली असेल. त्यामुळे ती तुमच्या हातातून सुटणार नाही. तुम्ही जेव्हा घराबाहेर पडाल तेव्हा तुमच्या मिनीला डबल, ट्रिपल प्रेम दाखवा, ज्या मुळे ती अजून इंप्रेस होईल.”