‘झी युवा’ वाहिनीवरील आपल्या सगळ्यांची आवडती ‘प्रेम पॉयजन पंगा’ ही मालिका, पून्हा एकदा नवे भाग घेऊन आपल्या भेटीला आली आहे. तीच मजा, तीच धमाल पुन्हा एकदा प्रेक्षकांना अनुभवायला मिळत आहे. आपल्या या लाडक्या मालिकेत, नागकुळातील भोळे कुटुंबावर एक नवं संकट उभं ठाकणार आहे. ‘मालिकेत एखादे नवे वळण पाहायला मिळणार का?’ असा प्रश्न, नागपंचमी स्पेशल भागाचा प्रोमो पाहून अनेकांना पडला आहे.

कुटुंबाच्या परंपरेनुसार, नागपंचमीच्या दिवशी मूळ रूपात, म्हणजेच नाग-नागिणीच्या स्वरूपात शंकराचे दर्शन घेण्याचा निर्णय जुईचे आई-बाबा घेतात. ठरल्यानुसार नागाचे रूप धारण केलेले असताना, आलाप आणि त्याचे बाबा जुईच्या घरी येतात असे प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे. जुईचे आई-बाबा एका खोक्यात लपून बसतात. मात्र लाडवाच्या खोक्याऐवजी, तोच खोका सगळ्यांसमोर नेला जातो. या सगळ्यामुळे झालेला गोंधळ आणि धमाल, २५ जुलैला नागपंचमी स्पेशल भागात पाझायला मिळणार आहे. खरंतर, खोक्यात नागाची जोडी पाहून इतरांची आणि ‘आपलं बिंग फुटणार का?’ या भीतीने जुईची बोबडी वळली आहे. नागाच्या रूपातील, जुईचे आईबाबा सगळ्यांच्या तावडीत सापडणार? की सुखरूपपणे तिथून त्यांची सुटका होणार, हे या भागात पाहायला मिळेल. हा स्पेशल एपिसोड अत्यंत धमाकेदार आणि विनोदी असणार आहे. अर्थात, झालेल्या गोंधळामुळे, वातावरणात टेन्शन सुद्धा पुरेपूर पाहायला मिळेल. तेव्हा, झकास मनोरंजन करणारा, हा अफलातून एपिसोड पाहायला विसरू नका, शनिवार २५ जुलै रोजी, रात्री ८.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या ‘झी युवा’ वाहिनीवर!!!