वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या २१ दिवसांचा लोकडाऊन जाहीर केला गेला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी घरी राहून सोशल डिस्टंसिंग करत कोरोनाला आळा घालायची जबाबदारी चोख बजावायची आहे. यामध्ये झी मराठी प्रेक्षकांची साथ देणार आहे. प्रेक्षकांच्या मनोरंजनाची जबाबदारी झी मराठी या वाहिनीने घेतली आहे. ही वाहिनी रसिक प्रेक्षकांसाठी सादर करणार एंटरटेनमेंट नॉन-स्टॉप. खास लोकाग्रहास्तव सोमवार ३० मार्च पासून सोमवार ते शनिवार प्रेक्षकांना ४ ते ८ वाजता स्वराज्यरक्षक संभाजी ही मालिका झी मराठी वाहिनीवर पाहता येईल. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. आता लॉकडाउनच्या काळात ही मालिका पुन्हा एकदा प्रसारित केली जाणार आहे.
३० मार्च रोजी म्हणजेच आज मालिकेचा पहिल्या दिवसाचा दोन तासांचा भाग प्रदर्शित होईल. दुपारी ४ वाजता ही मालिका प्रसारित होईल.