नुकत्याच संपन्न झालेल्या लंडन फॅशन वीक तसेच मिलान फॅशन वीक कॅलेंडरमध्ये फॅड इंटरनॅशनल अकॅडमी या लग्झरी फॅशन आणि स्टाइल क्षेत्रात अभ्यासक्रम देणा-या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिभेने सर्वांना प्रभावित केले. मायझू, हाऊस ऑफ डीके आणि वार्प बाय कुशीप परमार या फॅडच्या टॅलेंट्स लेबल्सनी लंडनमधील व्हिक्टोरिया हाऊस येथील लंडन फॅशन वीकमध्ये रनवे शो सादर केला. तसेच मिलान येथील डोल्स आणि गबाना शोमध्ये त्यांनी सादरीकरण केले. भारतीय संस्था आणि डिझायनर्सनी या कार्यक्रमात भाग घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. फॅड इंटरनॅशनलच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले हे कलेक्शन स्वदेशी बनावटीचे असून टीकाऊ, कलाकुसर, आणि अनोख्या वस्त्र प्रकारावर भर देते.
मायझू हे एक फॅशन लेबल असून ते फॅड अकॅडमीतील शगुन चौहान या विद्यार्थ्याने स्थापन केले आहे. चौहान यांच्या डिझाइन्स भाररतीय कलाकुसर, भरतकामातील समृद्धी आणि ठळक रंगावर भर देतात. हाऊस ऑफ डीकेचे डिझायनर देवेश कोठारी हे रंजक डिझाइन्स बनवण्यासाठी ताज्या आणि रोमांचक वस्त्र तसेच फॅशन तंत्रावर भर देतात. पारंपरिक फरला पर्याय निर्माण करण्यासाठी कोठारी यांनी अपसायकल प्री वोर्न डेनिमवर स्वत:च्या कल्पनांनुसार काम केले. कुशिप परमार यांचे हे अॅथलेजर ब्राइट रंगांसह भूमितीय तपशील तसेच रंजक आकारांवर भर देतेे. हे लेबल हंगर मॅगझिन आणि व्होग इंडिया यासारख्या प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रकाशित झाले आहे.
फॅड इंटरनॅशनल अकॅडमीचे संस्थापक संचालक शिवांग धृव म्हणाले, ‘विद्यार्थ्यांनी भारतीय आणि विदेशातील मार्केटमध्ये प्रवेश करण्याच्या उद्देशाने आम्ही त्यांच्यामध्ये गुंतवणूक करत आहोत. केवळ जागितक दर्जाचे शिक्षण देण्यापलिकडे विद्यार्थ्यांचा मार्ग यशस्वी ब्रँडकडे नेण्यासाठी, अतुलनीय उद्योगाच्या संधी तसेच व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा उद्देश आहे. ‘रनवे टू रिटेल’ या फॅड इंटरनॅशनलच्या प्रमुख तत्त्वानुसार, फॅशन जगतातील दोन महत्वपूर्ण शोजमध्ये विद्यार्थ्यांनी केलेली भरीव कामगिरी पाहून आम्ही आनंदित झालो आहोत.