जगभरात आपल्या अभिनयाचा ठसा उमटत असलेली अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता मराठी चित्रपटात झळकणार आहे. या सिनेमाच्या शुटिंगलाही सुरुवात झाली आहे.
प्रियांकाच्या या आगामी मराठी सिनेमाचं नाव ‘वेंटिलेटर’ असं आहे.
या सिनेमाची निर्मिती स्वत: प्रियांका चोप्रा करणार आहे. तिची प्रॉडक्शन कंपनी ‘पर्पल पेबल पिक्चर्स’च्या बॅनरखाली मराठी सिनेमाची निर्मिती होत आहे. तर राजेश मापुस्कर हे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.प्रियांकाने फोटो शेअरिंग साईट इंस्टाग्रामवर स्वत: या
सिनेमाबाबतची माहिती दिली. प्रियांकाने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत गणपती बाप्पाच्या फोटोसमोर ‘वेंटिलेटर’ सिनेमाची स्क्रिप्ट ठेवण्यात आली आहे.
“आमचा पहिला मराठी सिनेमा ‘वेंटिलेटर’च्या कामाला सुरुवात, ‘पर्पल पेबल पिक्चर्स’चं अभिनंदन. राजेस मापुस्कर आणि टीमला शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया”, असं प्रियांकाने इंस्टाग्रामवर म्हटलं आहे.
प्रियांकाने नुकतीच ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमात साकारलेल्या काशीबाईंच्या भूमिकेला चाहत्यांनी चांगलीच दाद दिली. त्यानंतर आता प्रियांका ‘वेंटिलेटर’च्या निमित्ताने मराठी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
The shooting for Ventilator, a film produced by Priyanka Chopra has started by traditional Pooja ceremony of the script of the film. Priyanka has congratulated her team for commencement of this venture on the twitter. The film will be directed by Ferrari Ki Sawari-fame Rajesh Mapuskar.
Priyanka Chopra has started her production house “Purple Pebble” and announced her Marathi film few days back. PeeCee has played role of Marathi girl in Kaminey, Agneepath and recent blockbuster Bajirao Mastani so Marathi culture is something she is familiar with. Mapuskar has earlier delivered a good and sensitive film like Ferrari Ki Sawari, so the expectation from this team will be very high.
We wish best of luck to the entire team of Ventilator and we will keep you updating about other details of cast and crew of this film.