मित्रांनो! बॉस मराठी ३ कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात झाली आहे. तिसऱ्या पर्वामध्ये विविध सेलिब्रिटींनी प्रवेश केला आहे. तसेच यामध्ये किर्तनकार शिवलीला पाटील यांनी देखील बिग बॉसच्या घरात प्रवेश घेतला आहे. दरम्यान शिवलीलाच्या समर्थकांपैकी काही जणांना मात्र तिचे बिग बॉसच्या घरात जाणे अजिबातच आवडलेले दिसत नाहीय. तिच्या बऱ्याच समर्थकांनी सोशल मीडियावर कमेंट करून नाराजी व्यक्त केली आहे.

यातून अस स्पष्ट होत आहे की शिवलीला यांना बिग बॉसच्या घरात जाण्याची गरज नव्हती. एका समर्थकाने “शिवलीला ताई तुम्ही कीर्तनकार आहात तुमची समाजाला गरज आहे बिग बॉसला नाही” तर दुसऱ्या समर्थकाने ” ताई मला वाटत हा तुमचा निर्णय चुकीचा ठरेल” अशी प्रतक्रिया दिली आहे. बिग बॉस मराठी ३ कार्यक्रम सुरू होऊन आता तिन दिवस झाले आहेत. बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी आता प्रत्येक स्पर्धक आटापिटा करताना दिसत आहे. बिग बॉसने दिलेली जबाबदारी नेटाने सांभाळत स्वतःचे घरातील स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.

या कार्यक्रमात टिकून राहण्यासाठी स्पर्धक एकमेकांवर कुरघोडी करू लागले आहेत. दुसऱ्या स्पर्धकावर मात करत स्वतःचे अस्तित्व टिकून राहण्यासाठी राजकारणही सुरू झाले आहे. कार्यक्रमातील स्पर्धकांचा खेळ पाहून मूळची कीर्तनकार असलेली शिवलीला पाटील भांबावून गेली. तिने आपल्या मनाची ही अवस्था दुसरी स्पर्धक मिनल शाहकडे व्यक्त केली. ते सांगतान शिवलीला पाटील हिला आपले अश्रू आवरता आले नाहीत.

बिग बॉस मराठी ३ च्या घरात प्रत्येक स्पर्धकाला टिकून राहण्यासाठी वेगवेगळे टास्क दिले जात आहेत. या टास्कमध्ये स्पर्धक ज्या पद्धतीने स्वतःला सिद्ध करतील त्यानुसार आणि इतर स्पर्धकांना स्वतःची उपयुक्तता पटवून कसे देतात यावर त्यांचे घरात टिकून राहणे अवलंबून राहणार आहे. बिग बॉसच्या घरात टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाची धडपड सुरू झाली आहे. एकमेकांना शह काटशह देत स्वतःचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी प्रत्येकजण आटापिटा करत आहेत.

हे करत असताना चेहऱ्यावर एक भाव आणि मनात वेगळाच विचार अशा पद्धतीने सगळेजण वागत आहेत. हे सगळे बघून तरुण कीर्तनकार शिवलीला चांगलीच भांबावून गेली. इतकेच नाही तर आपण या सर्वांसमोर कसे टिकून राहणार अशी चिंताही तिला एकीकडे सतावत आहे. तर दुसरीकडे आपल्याला ज्या पद्धतीने बिग बॉस मराठी ३ च्या घरात वागत आहोत ते पाहून आपल्या घरच्यांना विशेष करून आईला काय वाटत असेल, असा विचार सतत तिच्या मनात येत आहे.

शिवलीलाने तिच्या मनातील सर्व विचार दुसरी स्पर्धक मीनल शाह हिच्याकडे व्यक्त केले. हे सांगताना मीनल तिला सांगते, ‘तू अजिबात काळजी करू नकोस. तू खूप चांगली खेळत आहेस. भले आपल्या दोघींचे फारसे बोलणे होत नाही. पण तरीसुद्धा तू जे काही खेळत आहे ते कौतुकास्पद आहे. तुला कधीही माझी मदत लागली तरी ती करायला मी तयार आहे. हे लक्षात ठेव.’ मीनलाच्या या आश्वासक बोलण्याने शिवलीला अधिकच भावुक होते आणि तिला मिठी मारून रडू लागते. त्याचवेळी विशाल तिथून जात असताना शिवलीलाला विचारतो,’माऊली, काय झालं तुम्हांला तुम्ही का रडताय. तुम्ही काहीही काळजी करून नका. टेन्शन न घेता खेळा.’ पाहूया आता पुढे काय काय अन कसे कसे होते ते…

 

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी आपल्या व्हॉट्सॲपवर मिळवण्यासाठी लिंकला क्लिक करा 👉🏻 https://likeup.in/ आणि LikeUp या नावाने नंबर सेव करा.