ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

टीव्ही विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. सुशांत सिंह राजपूत आणि सिद्धार्थ शुक्ला यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्याचे खूपच कमी वयात निधन झाले आहे. एमटीव्ही लव्ह स्कूल फेम जगनूर अनेजा यांचे हृ’द’य’वि’का’रा’च्या झ’ट’क्याने इजिप्तमध्ये नि’धन झाले.

एका वृत्तानुसार, जगनूर अनेजा इजिप्तला व्हॅकेशन मध्ये फिरायला गेले होते. बुधवारी जगनूरने त्याच्या पिकनिकचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. जगनूर सतत आपल्या इजिप्त सहलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते. त्याने एक रील व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये तो इजिप्तचे सुंदर स्थान आणि पिरॅमिड दाखवताना दिसला. जगनूर अनेजा व्हिडिओ आणि फोटोंमध्ये पूर्णपणे फिट दिसत होते.

पिरॅमिड्ससह त्याच्या रील व्हिडिओवर, जगनूरने कॅप्शन लिहिले होते – “जेव्हा मी गिझाचे महान पिरामिड पाहिले तेव्हा एक स्वप्न साकार झाले. माझ्या बकेट लिस्टमधील एक इच्छा पूर्ण झाली.” कुणाला माहित होते की ही जगनूरची शेवटची यात्रा असेल. त्याची राहिलेली सर्व स्वप्ने अधूरी राहतील. जगनूर यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर चाहते, त्यांचे कुटुंबीय आणि सेलेब्स शोकसागरात आहेत. जगनूर यांचे निधन झालं आहे यावर कोणीही विश्वास ठेवू शकत नाही.

जगनूर यांनी एमटीव्ही लव्ह स्कूलच्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनमध्ये भाग घेतला होता. जगनूरने त्याची एक्स गर्लफ्रेंड मोनिकासोबतचे संबंध सोडवण्यासाठी शोमध्ये भाग घेतला होता. पण त्यांच्यामध्ये काहीही जमू शकले नाही आणि दोघांचे ब्रे’कअप झाले. शोच्या आणखी एका स्पर्धकाने जगनूरच्या लैं’गि’क प्रवृत्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि त्याला समलिंगी म्हटले होते.

चाहत्यांमध्ये सिद्धार्थ शुक्लाच्या निधनाचे दुःख अजून कमी झाले नव्हते की त्यांना आणखी एक वाईट बातमी ऐकायला मिळाली. सिद्धार्थचे वयाच्या 40 व्या वर्षी हृ’दयवि’का’राच्या झ’ट’क्याने नि’धन झाले. दुसरीकडे, सुशांतने 2020 मध्ये वयाच्या 34 व्या वर्षी आ’त्म’ह’त्या केली होती.