सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक फोटो व्हायरल होताना दिसतो आहे. हा फोटो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीची अशी का झालीय अवस्था?, तिचा हा असा अवतार पाहून सर्वजण झाले आहेत हैराण.
मित्रांनो!, सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा एक फोटो व्हायरल होताना दिसतो आहे. हा फोटो पाहून सर्वजण हैराण झाले आहेत. या फोटोतील अभिनेत्रीला तुम्ही ओळखलेत का?, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून सुप्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आहे. सुपर डान्सरमध्ये शिल्पा शेट्टीची एक अगदीच वेगळी आणि अनपेक्षित अशी बाजू दिसून आली. सुप्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग बसूने तर या सर्व प्रकाराला ‘बदले की आग’ असे म्हटले आहे.
सुपर डान्सर मधील वरिष्ठ कोरिओग्राफर वैभव घुगे याने या आणि इतर मागच्याही सत्रांमध्ये शिल्पा शेट्टीला लक्ष्य बनवून तिला सतत घाबरवले, सतावले आहे. त्यामुळे आता वेळ आली होती, शिल्पाने त्याची व्याजासकट परतफेड करण्याची आणि वैभवची चाल त्याच्यावरच उलटवण्याची! नुकतेच सुपर डान्सर सीझन ४ चे शूटिंग सुरू असताना शिल्पाला एक नामी संधी मिळाली. तिने असा काही सापळा रचला की, त्यात अडकलेल्या वैभवसकट सर्व सुपर गुरूंनी तिला ‘साष्टांग दंडवत’ घातले.
शिल्पा म्हणाली, “सुपर डान्सरच्या सगळ्या सीझनमध्ये, प्रत्येक वेळी वैभवने मला चकवले, घाबरवले की मी मनोमन याची परतफेड करण्याचे ठरवत असे. आम्ही दमणमध्ये या शोचे शूटिंग करत होतो, त्यामुळे मला पलटवार करण्याची नामी संधी मिळाली. मी अशा तयारीने निघाले, की दमणला एक दिवस आधी पोहोचता येईल. माझ्या टीमने माझ्या मेकअपचा खूप बारकाईने विचार केला होता आणि मी स्वतःला आरशात पाहिले, तेव्हा तो मेकअप पाहून स्वतः मी देखील दचकले होते”
ती पुढे म्हणाली, “मी हे यापूर्वीही सांगितले आहे की, सुपर डान्सरचा संपूर्ण क्रू माझ्या कुटुंबासारखा आहे. त्यामुळे, अशा वेळी मला खूप मजा येते.” संपूर्ण मेकअप करण्यासाठी शिल्पाला जवळपास तीन तास लागले. हॉटेलच्या मुख्य दारापाशी ती लपून बसली आणि दारातून आत येणार्या सगळ्या कोरिओग्राफर्सना तिने त्यांच्यावर झडप घालून घाबरवले. वैभवला शेवटी त्याच्या तोडीचा सव्वाशेर भेटला!
https://www.instagram.com/tv/CQv4bJ5hk14/?utm_source=ig_web_copy_link
सुपर डान्स गुरू वैभव घुगे म्हणाला की, “सुपर डान्सरशी निगडीत असलेल्या माझ्यासहित सगळ्यांसाठी शिल्पा मॅम एक प्रेरणा आहेत. मी त्यांना इतक्या वेळा घाबरवले आणि त्यांच्या खोड्या काढल्या, पण त्यांनी यावेळी आम्हाला जे घाबरवले तो प्रकार त्या सगळ्यावर कुरघोडी करणारा होता. एक दिवस आधी येऊन, तासन् तास चिकाटीने बसून मेक करून आमच्यासाठी त्यांचे हे करणे आम्हाला, त्यांच्यासाठी आम्ही कोणीतरी विशेष असल्याची जाणीव देणारे आहे. मला नाही वाटत की यापूर्वी कोणत्याही सेलिब्रिटी परीक्षकाने असे काही केले असेल. मी घाबरलो का???? अर्थातच ! प्रचंड घाबरलो!”