सध्या झी मराठी वाहिनीवर एकाच मालिकेच्या गोष्टीची चर्चा सर्व ठिकाणी रंगल्याची पहायला मिळते आहे. आणि ही मालिका म्हणजे इतर कोणतीही नसून थेट रात्रीस खेळ चाले ही आहे. आणि या मालिकेचं तिसरं पर्व आता झी मराठी वाहिनीवर येण्यास सज्ज झाल आहे.

सध्याच्या घडीला रात्रीस खेळ चालेच्या तिसऱ्या पर्वाचं झी वाहिनीकडून प्रचंड प्रमाणात प्रोमोशन सुरू असल्याचं पहायला मिळतं आहे. या जोरदार रंगलेल्या प्रोमोशनच्या माध्यमातून या मालिकेसाठी लोकांमधे असलेली उत्सुकता किती प्रचंड प्रमाणात आहे याची जाणीवदेखील आपल्याला येऊ शकते. याआधी कोणतीही अशी मालिका मराठी टेलीव्हिजनच्या क्षेत्रात कदाचित घडली नसेल, परंतु या मालिकेने कायमच एक नवा दर्जा रसिकप्रेक्षकांच्या समोर उभा करून ठेवला आहे.

या मालिकेतील शेवंता पात्र वठवणारी अभिनेत्री म्हणजेचं अर्थात अपुर्वा नेमळेकर. अपुर्वाने नुकतचं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर करत अण्णा नाईक प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची खबर दिल्याने सर्व रसिकप्रेक्षकवर्ग अगदी खुश झाल्याचा पहायला मिळतो आहे. अपुर्वाने तिच्या शेवंताच्या रूपातली ही पोस्ट शेअर केल्याचे दिसून येत आहे.

लाल रंगाची साडी, कुंकू, हिरवे चुडे आणि ऐन उंबरठ्यावर उभं राहत एक थरारक लुक अशा स्वरूपातली शेवंता तुम्हाला त्या फोटोंमधून पहायला मिळेल. तिच्या या लुक्सने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातलेला पहायला मिळतो आहे. सर्व ठिकाणी शेवंता परत येतेयं, अर्थातचं अण्णा नाईकही परत येणार अशा पोस्ट व्हायरलं होताना सध्या पहायला मिळत आहेत.

अपुर्वाची खरी कमाल तिच्या अभिनयाच्या कमाल आणि बहार अदाकारीतून आजवर सर्व रसिकप्रेक्षकांनी अनुभवली आहे. दुसरीकडे अण्णा नाईक म्हणजे एक प्रकारचा धाक, जरब, दरारा आणि पुर्णत: मनोरंजनात्मक कथानकाचा आस्वाद. एकूणच पहिल्याच पर्वापासून थरारक, भितीदायक असणाऱ्या या कथानकाला रसिकप्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं.

आणि जितकी उत्सुकता रसिकप्रेक्षकांच्या मनात या मालिकेविषयी वाढत गेली तितक्याच प्रमाणात ती मालिका त्या दर्जाची बनवण्यासाठी सर्व मालिकेच्या टिमचा कस पणाला लागला. एकप्रकारे आपला दर्जा आजवर सांभाळून प्रभावीपणे काम करत राहिलेल्या या मालिकेच्या टीमचं खरचं कौतुक करावं लागेल. शेवंता अर्थात अपुर्वाने नुकतेच जे फोटो शेअर केले आहेत, त्यापैकी एक फोटो तिचा वाड्यातल्या झोपाळ्यावर बसून असलेला पहायला मिळतो.

डोळ्यांना प्रखर तिरपा कटाक्ष टाकून ज्या पद्धतीने शेवंताचा हा लुक कॅच करण्यात आला आहे, तोदेखील सध्या चांगलाच चर्चेत आलेला पहायला मिळतो आहे. शेवंता आणि अण्णा नाईक यांच्या एन्ट्रीची घाई चाहत्यांना इतकी झाली आहे की अगदीच बेसुमार म्हणावं लागेल.

मुळात अण्णा नाईक हा दरारा ज्या अभिनेत्याने निर्माण केला तो अभिनेता म्हणजे माधव अभ्यंकर. दादा, विश्वविनायक, सेकंड इनिंग ही त्यांच्या गाजलेल्या प्रोजेक्ट्सची काही नावे होती. आणि आता त्यात रात्रीस खेळ चाले ह्या नावाचाही सामावेश निश्चितच झाला आहे. जजमेंट, पोश्टर गर्ल, सांगतो ऐका, सुराज्य, हॅपी जर्नी अशा विविध सिनेमांमधून त्यांनी चांगल्या प्रकारच्या भुमिका बजावल्या आहेत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!