नुकताचं दोन दिवसांखाली बॉलिवुडमधील सर्वाधिक सुंदर, लोकप्रिय, प्रसिद्ध अशा गायिकेचा जन्मदिवस साजरा करण्यात आला. अर्थातचं ही गायिका इतर दुसरीतिसरी कोणी नसून चक्क अल्का याग्निक आहे. अल्का याग्निक यांच्याविषयी काही बोलायचं म्हणजे केवळ त्यांच्या आवाजात एक वेगळीच ऊर्जा, एक वेगळीच जादू, जणू त्या आवाजातून स्वर्गाची स्वारी थेट व्हावी अशा काहीशा स्वरूपातील गोड गळा लाभलेल्या गायिका म्हणजे अल्का याग्निक.

आणि खरतरं गमतीशीर बात म्हणजे, या गायिकेकडून एक जबरदस्त किस्सा घडला होता जो की कदाचित आपल्या सर्वांच्या चेहर्‍यावर आश्चर्याची झड निर्माण करून जाऊ शकतो. “कयामत से कयामत” या सिनेमाच्यावेळी ही घटना घडली होती. आणि याचे प्रत्यक्षदर्शी त्याकाळी अनेक कलाकार होते.

या सिनेमातील गाण्याच्या रेकॉर्डिंगवेळी अल्का याग्निक यांनी आमिरला चक्क खोलीबाहेर जाण्याचे आदेश दिले होते. केवळ दिलेचं नाही तर घराबाहेर काढलेदेखील होते. आमिर बाबत हा किस्सा असा घडला की, “रेकॉर्डिंगवेळी अल्का याग्निक त्यांच्या गाण्याकडे एकटक लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करू लागल्या होत्या परंतु तिथे नेमकं एक मुलगा बसला होता जो सतत अल्का यांच्याकडे पाहत होता;

कुणीतरी आपल्याकडे एकटक पाहतोयं या भावनेने बऱ्याचदा अंगातली कला पाहिजे तशी बहरत नाही. त्यामुळे आमिरला थेट बाहेर जाण्याचा त्यांनी इशारा केला. आणि विशेष म्हणजे आमिर निमुटपणे गेलादेखील.” अल्का याग्निक यांनी हा किस्सा एका कार्यक्रात सांगितला होता.

अल्का याग्निक या सध्या जवळपास ५५ वर्षांच्या झाल्या आहेत. मुळात त्यांनी आपल्या वयाच्या 14 व्या वर्षांपासून गायनाला सुरूवात केल्याची समजते. खरतरं ज्यावेळी आमिर आणि अल्का याग्निक यांच्यातील तो किस्सा घडला आणि त्यानंतर पुढे दिग्दर्शकाने अल्का याग्निक यांची भेट सिनेमाच्या अभिनेत्याशी अर्थात आमिरशी घालून दिली तेव्हा त्यांना मनोमन कुठेतरी एक खंत निश्चितच निर्माण झाली होती.

अल्का याग्निक यांनी आमिरला त्यावेळी सॉरीदेखील म्हटले होते आणि आमिर हा किस्सा अजूनही एक मिश्किल आठवण म्हणून जपून ठेवतो. अल्का याग्निक यांच एकप्रकारे भारतीय सिनेमाक्षेत्रात गायनाचं योगदान फार मोलाच आजवर ठरलं आहे. त्यांनी गायलेली मधुर स्वरातील कितीतरी अशी गाणी आहेत, ज्यांची तुलना इतर कोणत्याही गाण्यांशी होऊ शकत नाही. अल्का याग्निक यांनी नीरज कपूर या व्यक्तीसोबत लग्न केलं आहे. आणि आता त्यांच्या कुटुंबात एक मुलगीदेखील आहे, जिचं नाव सायेशा आहे. अल्का याग्निक यांना गाण्याकरता राष्ट्रीय पुरस्कारदेखील दोन वेळा आजवर मिळाला आहे.

याव्यतिरिक्त अल्काच्या नावावर बरेच इतर सारे रेकॉर्ड्स आहेत. कोलकाता येथे जन्म घेतलेल्या अल्काचं आयुष्य तिच्या गुजराती कुटुंबात गेलं. भारतीय क्लासिक गायनातील अनेक बाबींची तरबेज होती अल्काची आई. त्यांच नाव होतं, “शुभा.” त्या काळात ऑल इंडिया रेडीओची धुम बरीच वेगळी होती. आणि अल्काची गायनासाठीची सुरूवात थेट “भजन” गाण्याकरता ऑल इंडिया रेडियोला झाली.

लावारीस, तेजाब, एक दो तीन, यांसारख्या अनेक साऱ्या हिंदी सिनेमांना अल्का याग्निकचे गाणे आपल्याला ऐकायला मिळतात. अल्का याग्निक यांच्याविषयी एक भन्नाट खासियत सांगायची म्हटलं तर त्यांनी २० पेक्षा अधिक भाषांमधे गायिका म्हणून काम केलेलं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!