SHENTIMENTAL Marathi Movie Release in 28 July 2017

1101

Shentimental Marathi Movie 

पांडू हवालदार झालाय आता शेंटिमेंटल!

अशोक मामांना वाढदिवसाच्या ‘शेंटीमेंटल’ शुभेच्छा !

मराठी चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार अशोक सराफ यांच्या,४ जूनला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘शेंटीमेंटल’ह्या लेखक-दिग्दर्शक, समीर पाटील यांच्या आगामी चित्रपटाची, अनोख्या पोस्टरने Shentimental  ‘सेंटीमेंटल’ घोषणा केली आहे ! ‘पोस्टर बॉईज’ आणि Poshter Girl ‘पोस्टर गर्ल्स’ ह्या समीर पाटील यांच्या यशस्वी चित्रपटानंतर आता Shentimental ‘शेंटीमेंटल’ ह्या तिसऱ्या चित्रपटाचे हे पोस्टर खऱ्या अर्थाने ‘सेंटीमेंटल’आहे कारण या पोस्टर मध्ये हवालदाराच्या वेषात असलेल्या अशोक मामांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या गेल्या आहेत ! हवालदाराचा वेष मामांसाठी खरचच खूप खास आहे ! १९७५ मध्ये त्यांच्या करियरची सुरुवात ‘पांडू हवालदार’ या चित्रपटाने झाली होती. त्यात त्यांची हवालदारची भूमिका खूप गाजली होती आणि आज ४२ वर्षानंतर ‘शेंटीमेंटल’ या  चित्रपटात देखील ते हवालदारच्या, किंबहुना हवालदाराच्या भूमिकेतून बढती घेऊन सहाय्यक पोलीस उप निरीक्षक ह्या भूमिकेत येत आहेत. अशोक मामांचा अभिनय आणि संवाद शैलीतील‘अचूक टायमिंग’ याला संपूर्ण मराठी चित्रपट सृष्टीत तोड नाही !  गेली ४०-४५ वर्षं आपल्या चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या – प्रसंगी मामा बनवणाऱ्या मामांच्या वाढदिवसाच्या दिवशीच ‘शेंटीमेंटल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची घोषणा होते आहे, हा निव्वळ योगायोग नसून रसिकांच्या तीन पिढ्यांचं भाग्यच म्हणावं लागेल !

विनोदाचे अनभिषिक्त बादशहा असलेल्या अशोक मामांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !  आजपर्यंत मामांनी जसं संपूर्ण चित्रपट सृष्टीला हसवत ठेवलं तसचं याही पुढे ते प्रेक्षकांना निखळपणे हसवत ठेवणार हे नक्की ! त्यामुळे या जाहिराती मध्ये पण गंमतीदारपणे उल्लेख केल्या प्रमाणे २८ जुलैला प्रेक्षकांना हसून हसून मेंटल करायला, ‘शेंटीमेंटल’ येतोय, त्याची प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागून राहिली आहे !