मराठी सिनेचित्रपटसृष्टी मधला एक उभरता आणि खणखणीत अभिनेता म्हणजे अर्थातच शशांक केतकर. सध्या शशांक केतकर त्याच्या सोशल मीडियावरील एका रंगतदार पोस्टमुळे पुन्हा चर्चेत आला असल्याचं पहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच शशांकने त्याच्या घरी गोंडस बाळ आल्याची बातमी सर्वांना दिल्यानंतर आता शशांकबाबत एक नवी गोष्ट आपल्याला पाहायला मिळत आहे.
सिनेसृष्टी कुठलीही असो हिंदी, तमिळ ,मल्याळम अथवा मराठी प्रत्येक ठिकाणी सिनेमासृष्टीत गाण्यांशिवाय एखाद्या कलाकृतीचं पान कधी हालत नाही. थोडक्यात काय तर इथल्या प्रेक्षकाला संगीतबद्ध केलेलं एखादं तरी गाणं नेहमी हवंच असतं. ज्या पद्धतीने सिनेमांमधील अथवा अल्बम गीतांमधील गाणे आज-काल हीट होत असतात त्याचप्रमाणे बऱ्याचदा अनेक मालिकांची शीर्षकगीतेदेखील फार प्रमाणात हीट होऊन जातात.
आणि हीट झाल्यानंतर त्यांची चर्चा अगदी प्रत्येकाच्याच सोशल मीडिया अकाउंटवर रंगायला लागते. इथेही मामला अगदी काहीसा तसाच होत असल्याचं पहायला मिळतं आहे. सध्याच्या घडीला नव्याने शीर्षकगिताची शशांकच्या अकाउंटवरून पोस्ट शेअर झाली आणि मालिकेच्या त्या शीर्षकगीताने रसिकप्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
अनेकदा असंही आपण पाहिलं आहे की, एखादी मालिका बं’द पडते परंतु तिच्या शीर्षकगीताची आठवण कायम रसिकांच्या मनात कोरलेली राहते. जसं की, झी मराठी याच वाहिनीवरील जुळून येती रेशीमगाठी या मालिकेच्या शीषर्कगीताच्या बाबतीत घडलं होतं, आजही ते गीत तेवढंच प्रसिद्ध आणि मनावर वेगळा आस्वाद देऊन जाणारं ठरतं.
मुळात “येऊ कशी तशी मी नांदायला”, “आभाळमाया”, “वादळवाट” यांसारख्या मालिकेच्या शीर्षकगीतांनी मालिका संपल्यानंतरही आजवर रसिकप्रेक्षक त्या गाण्यांवर खिळवून ठेवला हे विशेष म्हणावं लागेल. काहींची डायलर ट्युन तर काहींची रिंग टोन बनून ही गाणी सोबत राहिली.
शशांक केतकर याची नवी मालिका” पाहिले न मी तुला” ही प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच येत आहे आणि त्या मालिकेचं शीर्षकगीत स्वत: शशांकने त्याच्या सोशल मीडियावर व्हिडिओतून पोस्ट केलं आहे. ही पोस्ट व्हायरलं होण्यापाठचं कारण म्हणजे, दर्जेदार गाण्याची निर्मिती या शीर्षगीताची झालेली पहायला मिळते आहे. कवी, लेखक वैभव जोशी यांनी हे गीत रचलं आणि आनंदी जोशी यांनी याला स्वरबद्ध केल्याने गाण अगदी मं’त्र’मु’ग्ध करून जातं.
सोशल मिडियावर चौफेर याच गाण्याची चर्चा रंगली आहे. अनेकांनी यावर चांगल्या प्रतिक्रियाली कमेंट्सच्या माध्यमातून दिल्या आहेत. झी मराठीने यानंतर या गाण्याच्या मेकिंगचा व्हिडिओ त्यांच्या सोशर मिडियावरही शेअर केला असल्याचं पहायला मिळतं आहे.
सध्यातरी शशांक केतकर याच्याबाबत सर्वच रसिकप्रेक्षकांना उत्सुकता होती आणि त्यात आता त्याच्या मालिकेच्या शीर्षकगीतानेच जर रसिकांच मन जिंकलं असेल तर निश्चितच मालिकादेखील चांगली वाटचाल करेल, अशी अपेक्षा आहे. शशांक केतकर आता बऱ्याच वेळानंतर पुन्हा छोट्या पडद्यावर पहायला मिळणार असल्याने चाहत्यांना फारच आनंद झाला असल्याच दिसून येत आहे.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून आवर्जून कळवा. आम्ही आपल्याकरता मनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. आवडल्यानंतर पोस्टना लाईक व शेअर जरूर करा. तुमचा प्रतिसाद आम्हाला प्रेरणादायी ठरत असतो. तुम्हालाही काही लिहून पाठवायचे असल्यास आम्हाला मेल करा. आम्ही आपल्या नावासहित इथे ते प्रसिद्ध करू. धन्यवाद!