राजा रानीचे लग्न अनेक संकटांना तोंड देत अखेर निर्विघ्नपणे पार पडले… संजीवनीचा गृह प्रवेश झाला… एरव्ही बिनधास्त दिसणारी संजीवनी ढाले पाटलांच्या मोठ्या घरात कुसुमावती आणि इतर कुटुंबातील मंडळीसमोर थोडी बुजल्यासारखी वावरताना दिसते पण रणजीतसोबत असताना तिचं वागण अगदी बिनधास्त असत… नवे कुटुंब, नव्या जबाबदार्‍या, अपेक्षा या सगळ्यामध्ये संजीवनीला रणजीतची भक्कम साथ मिळाली आहे… रणजीत आणि बेबी मावशीच्या साथीने संजीवनीला धीर मिळाला आहे… संजीवनी – रणजीतचे नाते हळूहळू खुलू लागले आहे… लग्नानंतर घरामध्ये सत्यनारायणाची पूजा ठेवली आहे, आणि त्या निमित्ताने संजीवनीच्या माहेरच्या लोकांना देखील बोलावले आहे… संजीवनी – रणजीत जोडीनं सत्यनारायणाची पूजा करणार आहेत… ही पूजा व्यवस्थित पार पडत असतानाचं कुसुमावती संजीवनीच्या आईचा सगळ्यांसमोर अपमान करते. संजीवनी – रणजीत हा क्षण कसा सांभाळून घेतील ? बेबी मावशी कसा संजीवनीला धीर देतील… हे प्रेक्षकांना महा रविवारच्या विशेष भागामध्ये कळेलच… तेंव्हा नक्की बघा येत्या रविवारचा विशेष भाग आपल्या कलर्स मराठीवर संध्या ७.०० वा.

परंपरेनुसार नव्या नवरा-नवरीने लग्नानंतर जोडीने जाऊन देवाचे आशीर्वाद घ्यायचे असतात, आणि याचनिमित्ताने हा पारंपारिक विधी संजीवनी – रणजीत लवकरच पार पाडणार आहेत… नवरा-बायकोचं नातं खऱ्या अर्थाने समृद्ध होण्यासाठी संजीवनी आणि रणजीत देव दर्शनासाठी जाणार आहेत. ह्या प्रथेनुसार नवऱ्याने बायकोला उचलून पायऱ्या चढायच्या असतात… संजीवनी आणि रणजीतसाठी मात्र हा विधी एका नव्या नात्याची सुरुवात करून देणारा क्षण ठरणार आहे… देवाच्या आशीर्वादाने संजीवनी – रणजीतच्या सुखी संसाराची सुरुवात होणार आणि या दोघांचं नातं खुलणार हे नक्की !

तेंव्हा नक्की बघा पुढील आठवड्यात राजा रानीची गं जोडी सोम ते शनि संध्या. ७.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.