स्वामिनी मालिकेमध्ये माधवरावांच्या तब्येतीबद्दल कळताच खूप काळानंतर रमाबाई थेट शनिवार वाड्याला परतल्या. जानकीबाई आणि त्यांच्या बाळाच्या अचानक झालेल्या मृत्युमुळे शनिवारवाड्यात दु:खाचे वातावरण आहे. आणि या घटनेमुळे माधवराव आणि विश्वासरावांनी गोपिकाबाईंशी अबोला धरला. कारण, गोपिकाबाई यासगळ्याला कारणीभूत आहेत असे माधवराव आणि विश्वासरावांचे मत होते… परंतू, पार्वतीबाईंच्या मध्यस्तीमुळे माधवरावांनी अबोला सोडला आहे. माधवरावांची प्रकृती बघता गोपिकाबाईंच्या आदेशानुसार रमाबाईंना शनिवार वाड्यामध्ये पुन्हा बोलावणे पाठवले. रमाबाईंची शनिवारवाड्यात परती झाल्यामुळे आता पुन्हा आनंदाचे दिवस आले हे नक्की ! या दरम्यानच शनिवारवाड्यात रमाबाईंना चिमुकला साथी मिळाला आहे, आणि तो म्हणजे माधवरावांचा भाऊ नारायणराव… छोटे नारायणराव रमाबाईंच्या सोबत अगदी छान रमतात. सीनसंपल्यावर देखील हेच दृश्य कायम असते… या लहानश्या नारायणरावांसोबत खूप सुंदर सीन मालिकेमध्ये पुढे देखील बघायला मिळणार आहेत…

याचसोबत स्वामिनी मालिकेमध्ये अजून एक जोडगोळी दिसून येते ती म्हणजे, रामचंद्र आणि रमाबाई… या दोघांचेदेखील खूप गोड नाते मालिकेमध्ये सुरुवातीपासून बघायला मिळते आहे, मग ते खोड्या काढणे असो वा मस्ती करणे असो पण रमाबाईंना मात्र त्यांची अगदी भक्कम साथ मिळाली आहे. रामचंद्र रमाबाईंच्या सावलीसारखा बरोबर असतो. रामचंद्र म्हणजे नित्या पवार आणि सृष्टी हे दोघे मिळून सेटवर खूप धम्माल मस्ती करतात…मग ते एकत्र सीनची उजळणी करो असो, वा सेटवर दंगा मस्ती करणे असो… रामचंद्र याला त्याच्या संपूर्ण नावानेच संबोधलेलं अधिक आवडते आणि त्यामुळे मालिकेमध्ये देखील त्याला त्याच्या पूर्ण नावानेच हाक मारतात.