ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

 

महाराष्ट्रच नाही तर अख्या देशाला याड लावणारा आणि मराठी सिनेसृष्टीतील सुपरहीट सिनेमा ‘सैराट’ चा कन्नड रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. सैराट सिनेमातील ‘झिंग झिंग झिंगाट’ गाण्याने सर्वांनाच वेड लावलं होतं. अगदी तशाच प्रकारचं गाणं कन्नडम सिनेमातही आहे. ‘झिंग झिंग झिंगाट’ गाण्याचं कन्नड गाणं रिलिज झालं असून या गाण्याने सोशल मीडियात धुमाकूळ घातला आहे.

नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ या चित्रपटाने महाराष्ट्रातीलच नाही देशभरातील प्रेक्षकांना याड लावलं. एवढेच नाही तर परदेशातही या सिनेमाचीच चर्चा ऐकायला मिळाली. या सिनेमाचा प्रभाव इतका पडला की आता या सिनेमाचा कन्नड रिमेक येत आहे. ‘सैराट’चा कन्नड रिमेक असलेला ‘मनसु मल्लिगे’ हा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात रिंकू राजगुरु दिसणार आहे

Manasu Mallige ‘मनसु मल्लिगे’ या सिनेमाची निर्मिती रॉकलाइन व्यंकटेश ने केली आहे. ‘सैराट’च्या दाक्षिणात्य भाषेतील रिमेकचे अधिकार रॉकलाइन व्यंकटेश निर्मिती संस्थेने घेतले असून हिंदी भाषेतील अधिकार करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने विकत घेतले आहेत. मात्र, अद्याप या सिनेमाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाहीये.