Sairat Marathi Movie Review

सैराट सिनेमातील शेवट आणि त्यातील त्या चिमुकल्याचा अभिनय हा अजूनही चर्चेचा विषय आहे. याच शेवटच्या सीनचं गुपितही नागराज यांनी उघड केलं. ‘सैराटमधील चिमुकला प्रचंड रडका आहे, त्यामुळे शूटिंगसाठी मोठी कसरत झाली. शेवटचा सीन हा पूर्णपणे या चिमुकल्याच्या हावभाव आणि देहबोलीवर अवलंबून होता. त्यामुळे हा सीन शूट करताना आमचं संपूर्ण कसब पणाला लागलं. त्यामुळे या सीनसाठी आम्ही एक युक्ती केली.’

 

‘या चिमुकल्याला खेळण्यासाठी एक गाडी दिली आणि तिचा रिमोट कंट्रोल मी माझ्याकडे ठेवला. त्यासाठी मी पहिल्यांदाच आयुष्यात रिमोटची गाडी शिकलो. जेव्हा मी त्याच्या जवळ ती गाडी न्यायचो त्यावेळी तो हसायचा आणि जेव्हा मी गाडी दूर न्यायचो त्यावेळी तो रडायचा. असं करत करत तो सीन शूट केला. तसंच रिंकूच्या शेजारणीचा रोल मी त्याच्या आईलाच दिला. त्यामुळे शेवटी तो त्याच्या आईकडे रडत जात होता होता.’

 

त्यामुळे या एका सीनसाठी नागराज मंजुळेंना बऱ्याच क्लुप्त्या लढवाव्या लागल्या होत्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here