सैराट सिनेमातून घराघरात पोहोचलेले रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. रिंकू राजगुरू एका जाहिरात झळकणार आहे तर आकाश ठोसर महेश मांजरेकरांच्या आगामी ‘एफयु’ सिनेमात काम करताना दिसणार आहे.
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आकाशला नव्या सिनेमासाठी कास्ट केलं आहे. आकाश ठोसर या सिनेमात मुख्य भूमिकेत असणार आहे. सिनेमाचं शुटिंग सुरु झालं आहे. ४ मित्रांची स्टोरी या सिनेमात दाखवण्यात येणार आहे. महेश मांजरेकरांचा मुलगा देखील या सिनेमात झळकणार आहे.
आजच्या तरुण पिढीची भाषा आणि त्यांची लाईफस्टाईल या सिनेमात पाहायला मिळणार आहे. सैराटच्या मोठ्या यशानंतर आता हा मराठी सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती धमाल करेल हे पाहावं लागेल.