९०च्या दशकातील लाल दुप्पटेवाली हे गाणं आठवत असेल ना… हे गाणं चंकी पांडे व रितु शिवपुरीवर चित्रीत करण्यात आले होते. हे गाणं आँखे चित्रपटातील आहे. या चित्रपटात गोविंदा मुख्य भूमिकेत होते. रितुने त्यावेळी बरेच हिट सिनेमे केले आहे. मात्र हळूहळू ती बॉलिवूडपासून गायब झाली आहे. रितु शिवपुरीचा जन्म 22 जानेवारी 1975 रोजी मुंबईत येथे झाला होता.
आँखे चित्रपटानंतर रितु शिवपुरीने बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. त्यात ‘हम सब चोर हैं’, ‘आर या पार’, ‘भाई भाई’, ‘हद कर दी आपने’, ‘लज्जा’, ‘शक्ति: द पावर’ व ‘ऐलान’ चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटात ती सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेत होती.
या चित्रपटाशिवाय तिने २ टीव्ही सीरिअल्स मध्ये काम केले आहे, त्यांमध्ये इस प्यार को क्या नाम दूं 3, नजर आणि विश यासह अनेक टीव्ही मालिका सामील आहेत. काही वर्ष चित्रपटात नशीब आजमावल्यानंतर 2006 मध्ये रितू शिवपुरीने बॉलिवूड सोडले. ज्यानंतर ती तिच्या विवाहित जीवनात रमली.
अक्षय कुमारसोबत एक बोल्ड फोटोशूट केले होते
अक्षय कुमारसोबत टॉपलेस फोटोशूट करुन रितू शिवपुरी चर्चेत आली होती. फोटोमध्ये ती शॉर्ट्स परिधान करताना दिसली होती, तर अक्षय कुमारही शर्टलेस होता. हे फोटोशूट प्रसिद्ध मासिकासाठी केले गेले होते. हा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करताना तिने लिहिले की, ‘मी आणि अक्षय बर्याच वर्षांपूर्वी’. हा फोटो शेअर केल्यानंतर रितू चर्चेत आली आणि तिने हा फोटो डिलीट केला.
२०१४ साली एका मुलाखतीत रितुने कमबॅकच्या चर्चेवर सांगितले की, जेव्हा २००६ साली पंजाबी चित्रपटासाठी १८ ते २० तास काम करून परतायचे त्यावेळी नवरा झोपलेला असायचा. या गोष्टीमुळे रितु त्रस्त झाली होती. करियरच्या चक्करमध्ये कुटुंबाकडे लक्ष देता येत नव्हते.
ती पुढे म्हणाली की, मी लकी आहे की माझा नवरा अभिनेता नाही. ते सरळ साधे आहेत आणि त्यांनी कधी माझी तक्रार केली नाही. पण मला अपराधी असल्यासारखे वाटू लागले आणि मी अभिनय सोडण्याचा निर्णय घेतला आणि आणखीन काही वर्षे कुटुंबासोबत व्यतित करण्याचा निर्णय घेतला.
रितुने तिची आई अभिनेत्री सुधा शिवपुरी यांच्या पावलावर पाऊल टाकत चालण्याचे स्वप्न पाहू लागली. रितुचे वडील ओम पुरी देखील बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता होते. काही वर्षांपूर्वी रितु शिवपुरीने काही वर्षापूर्वी छोट्या पडद्यावर कमबॅक केले. ती अनिल कपूरचा शो २४मध्ये झळकली होती.
आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.
तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.