तान्हाजी-द अनसंग वाॅरीअर चित्रपट नुकताच 10 जानवारी रोजी रिलीज झाला आणि तो प्रेक्षकांवर फार उत्तमरित्या ऐतिहासिक कथेची भुरळ पाडतोय. वीर बाजी तान्हाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची शौर्यगाथा सांगणारा हा चित्रपट आहे. सध्या या चित्रपटाची बाॅक्स आॅफीसवर घौडदौड वेगात सुरूच आहे. सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण बात म्हणजे, या आठवड्यात सोमवार ते शुक्रवार या दरम्यान प्रत्येक दिवशी चित्रपटाने सरासरी दर दिवसाला सरासरी तब्बल ७ कोटी अशी कमाई केली आहे.

आजवरच्या चित्रपटांच्या कारकिर्दीत हा एक दैदीप्यमान टप्पा आहे, हेच म्हणावं लागेल. अजय देवगण, सैफ अली खान, काजोल आणि शरद केळकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला तान्हाजी- द अनसंग वाॅरीअर हा चित्रपट छपाक या हिंदी दिपीका पादुकोनची भूमिका असलेल्या एका ऍसिड ऍटॅक चा शिकार झालेल्या तरूणीची कथा मांडलेल्या कथेसोबत प्रदर्शित झाला.

छपाक हा दुर्दैवाने चांगला वाखाणण्याजोगा चित्रपट असूनदेखील बाॅक्स आॅफीसवर कमाई करू शकला नाही. याच मुख्या कारण ठरला तो “तान्हाजी- द अनसंग वाॅरीअर”.

१५० कोटी एवढ्या प्रचंड बजेटचा तान्हाजी ह्या चित्रपटाने समीक्षकांकडून वाहवाहीची परवनी तर मिळवलीच शिवाय प्रेक्षकांची ह्रदयेदेखील काबिज केली, असं म्हणायला हरकत नाही. तान्हाजी या चित्रपटाचा हा तिसरा आठवडा अजूनही सुरूच आहे. काही ठिकाणी अजूनही शो हे हाऊसफूल ठरत आहेत.

आणि या चित्रपटाने २०० कोटींचा गल्लाही तेवढ्याच उस्फूर्तरित्या ओलांडला आहे. सगळ्यात लक्ष वेधून घेतली जाणारी बाब म्हणजे, या चित्रपटाची झालेली नाॅन-विकेंड कमाई. २०२० या वर्षीचा हा सध्यातरी एवढ घवघवीत यश मिळवणारा प्रथमच चित्रपट ठरला आहे.

प्रेक्षकांमधेही सध्या या चित्रपटाच्या ३०० कोटींच्या क्लबमधे प्रवेशाची ओढ लागली आहे. या चित्रपटाच एवढ घवघवीत यश आणि रसिकप्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता नकळत का होईना पण पुन्हा एकदा अजय देवगणची जादू सर्वस्त्र पसरली असचं म्हणावं लागेल. हा चित्रपट पहिल्याच दिवशी एकूण ४५४० स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला.

अजयने खुद्द तान्हाजी मालुसरे यांची भुमिका उत्कृष्टरित्या निभावली आहे. एवढेच नव्हे तर काजोल, शरद केळकर, देवदत्त नागे, शशांक शेंडे यांनीदेखील योग्य परिने मेहनत घेऊन भूमिकांचं हुबेहुब अवतरण केल आहे. जेव्हा केव्हा अजय देवगण हे नाव आता प्रेक्षकांकडून घेतलं जाईल तेव्हा तेव्हा “तान्हाजी – द अनसंग वाॅरीअर ” हा चित्रपटच सर्वप्रथम प्रत्येकाच्या मनात येईल, हे नक्की.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.