छत्रपति शिवाजी महाराजांवर बायोपिक करणार – रितेश देशमुख

shivaji ritesh

 

हाऊसफूल आणि हाऊसफूल २ नंतर रितेश देशमुख आता या सिरीजचा तिसरा चित्रपट हाऊसफूल ३ चित्रपट येणार आहे. एका  हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रितेशने आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती दिली.

 

रितेश देशमुख आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर होणाऱ्या बायोपिकमध्ये काम करणार आहे. या चित्रपटाचे नाव छत्रपती शिवाजी असणार आहे.

 

लई भारीनंतर… 

बॉलिवुडमध्ये एकापेक्षा एक सरस भूमिका वठवणाऱ्या रितेश देशमुखची ‘मराठी’तील एन्ट्री ‘माऊली’च्या रुपाने दमदार झाली. ‘लय भारी’ या मराठी चित्रपटाच्या यशानंतर आता लवकरच त्याचा ‘छत्रपती शिवाजी’ हा चित्रपट येत आहे. यात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांसारखे उत्तुंग व्यक्तिमत्त्व पडद्यावर साकारणार आहे.

 

रितेशचा दुसरा मराठी चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीला बऱ्याच कालावधीनंतर अॅक्शन हिरो मिळाला तो मराठमोळ्या रितेश देशमुखच्या रुपानेच. ‘लय भारी’तील या माऊलीचा ‘आपला हात भारी, आपली लाथ भारी’ हा डायलॉग प्रत्येकाच्या मुखातून ऐकायला मिळत होता.

 

जेनेलिया करणार निर्मिती….

आता ‘लय भारी’च्या यशानंतर रितेश पुन्हा एकदा मराठी चित्रपटातून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणार आहे. त्याचा ‘छत्रपती शिवाजी’ हा चित्रपट येत आहे. त्याची निर्मिती रितेशची पत्नी जेनेलिया आणि मुंबई फिल्म कंपनी करणार आहे. या चित्रपटात रितेश छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी स्वतः रितेश उत्सूक आहेच, पण त्याचा चित्रपट आणि त्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत रितेशला पाहण्यासाठी त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सूकता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here