‘झी युवा’वर सुरू असलेली ‘युवा डान्सिंग क्वीन’ ही स्पर्धा, अल्पावधीतच खूपच लोकप्रिय झालेली आहे. १४ ललनांचा सहभाग असलेली ही स्पर्धा आता अधिक चुरशीची होऊ लागलेली आहे. परीक्षक मयूर वैद्य आणि सोनाली कुलकर्णी यांचा कस लागत आहे. स्पर्धकांच्या उत्तमोत्तम परफॉर्मन्समुळे स्पर्धेची रंगत अधिक वाढली आहे. अद्वैत दादरकर याचे खुमासदार सूत्रसंचालन आणि स्पर्धकांमधील वाढलेली चुरस, यामुळे हा कार्यक्रम यशाची नवनवी शिखरे गाठत आहे. ‘झी युवा’ वाहिनी प्रेक्षकांसाठी नेहमीच नवनवीन गोष्टी घेऊन येत असते. ‘युवा डान्सिंग क्वीन’मधून होणारे प्रेक्षकांचे मनोरंजन सुद्धा याला अपवाद ठरलेले नाही.
या स्पर्धेतील सर्वच स्पर्धकांनी, पहिल्या दिवसापासूनच आपला ठसा उमटवला आहे. ‘लागिरं झालं जी’ या मालिकेत, ज्या पूर्वा शिंदेला प्रेक्षकांनी एक दमदार अभिनेत्री म्हणून पाहिलं, ती नृत्यांगना म्हणूनही आपला जलवा दाखवत आहे. सर्वच प्रतिस्पर्ध्यांसमोर मोठे आव्हान निर्माण करण्यात ती सुरुवातीपासूनच यशस्वी ठरलेली आहे. तिच्या उत्कृष्ट अभिनयाची झलक जशी प्रेक्षकांनी पाहिली, तसेच तिच्या डान्सचा सुद्धा मोठा चाहतावर्ग निर्माण झालेला आहे.
पोवाड्यासारख्या संगीतप्रकारावर, नृत्य सादर करण्याचे आव्हान पूर्वाने ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या या भागात स्वीकारले होते. सध्या स्त्रियांवर होत असलेले बलात्कार, त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती, हा मोठा आणि कठीण विषय सुद्धा तिने लीलया हाताळला. तिच्या परफॉर्मन्सवर परीक्षक खूप खुश होते. सध्या बहुचर्चित असलेल्या या विषयावर एक कवितादेखील पूर्वाने सादर केली. नेहमी धमाकेदार नृत्यविष्कारांनी रंगणारा ‘युवा डान्सिंग क्वीन’चा मंच काहीसा भावनिक झालेला पाहायला मिळाला.
स्पर्धेतील असे वेगवेगळे रंग अनुभवण्यासाठी अवश्य पाहत रहा, ‘युवा डान्सिंग क्वीन’, बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता, फक्त आपल्या लाडक्या ‘झी युवा’वर!!!