” तान्हाजी ” या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला आहे. डायरेक्टर ओम राऊत यांनी डायरेक्ट केलेला हा चित्रपट 10 जानेवारी 2020 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रसिद्ध झाला. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरती चित्रपट असल्यामुळे याला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिस वरती गेल्या दोन दिवसातच प्रचंड कमाई केलेली आहे. आपण जाणून घेऊयात या चित्रपटाच्या स्टारकास्ट ने या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी किती फीस घेतलेली आहे.

सैफ अली खान : नेहमीच्या हिरोच्या भूमिकेपेक्षा वेगळी भूमिका सैफ अली खान या चित्रपटामध्ये साकारत आहे. अनेक वेब सिरीज आणि चित्रपटांमध्ये सैफ अली खानने त्याला दिलेली जबाबदारी अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडलेली आहे.” तान्हाजी- द अनसंग वॉरियर ” या चित्रपटामध्ये त्याने एक निगेटिव्ह रोल स्वीकारला आहे. या रोलसाठी त्यांनी जवळपास सात करोड रुपये एवढे मानधन घेतलेले आहे.

जगपति बाबू : दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये एक सुप्रसिद्ध अभिनेता म्हणून प्रसिद्ध असलेला जगपति बाबू, 57 वर्षीय असला तरी आजही दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये त्याचं वलय आढळून येतं. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक महत्त्वाचे चित्रपट केलेले आहेत. या चित्रपटांमध्ये काम करण्यासाठी त्याने जवळपास दोन करोड रुपये एवढे मानधन स्वीकारले आहे.

काजोल : बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या जोडीपैकी एक जोडी म्हणजे काजोल आणि अजय देवगण यांची. या दोघांनीही चित्रपटामध्ये खूपच छान काम केलेलं आहे. या चित्रपटामध्ये काजोल तानाजी मालुसरे त्यांची धर्मपत्नी लक्ष्मीबाई यांच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या भूमिकेसाठी तिने पाच करोड रुपये मानधन घेतल्याचे सांगितले जाते.

सुनील शेट्टी : नव्वदच्या दशकामध्ये अनेक तरुणांच्या मनावरती गारुड प्रस्थापित करणारा हा दिग्गज अभिनेता, या चित्रपटामध्ये देखील सुनील शेट्टी ने एक मुख्य भूमिका साकारली आहे. सुनील शेट्टी या चित्रपटामध्ये ” मिर्झाराजे जयसिंग ” यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटासाठी सुनील शेट्टी यांनी तीन करोड रुपये मानधन घेतले आहे.

अजय देवगन : अजय देवगन याने बॉलिवूडला अनेक सुप्रसिद्ध असे सिनेमे दिले आहेत. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावरती अनेक सिनेमा गाजवले आहेत. या चित्रपटामध्ये अजय देवगन नरवीर तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी अजय देवगनने तब्बल तीस करोड रुपये एवढे मानधन घेतले आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.