सध्या मराठी मालिका आई माझी काळूबाई ही खुप चर्चेत आहे. कारण त्यामधील अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे मालिकेच्या सर्वांनाच खूप त्रास झालेला आहे, असं मालिकेच्या निर्मात्या अलका कुबल यांचं म्हणणं आहे.
अश्यात निर्मात्यांनी प्राजक्ता गायकवाड ला बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे.
लॉकडाऊननंतर नव्या मालिका सुरु झाल्या. काहींनी काळजी घेतली तर काहींनी घेतली नाही. तिथे कोरोना बाधित सापडले आणि मग त्या थांबवल्या गेल्या.
पण मग मी कोविड काळात काळजीच्या भीतीने एकदा दोनदा थोडा उशीर झाला तर माझ्यावर आणि कुटुंबातील व्यक्तींवर शिवीगाळ करण्यात आली. ज्यामुळे मला वाईट वाटणं साहजिकचं आहे. मी अलका ताई यांना आई आणि समीर सरांना वाडीलांप्रमाणे मानते; तरीही माझ्यावर खोटे आरोप केले जात आहे. माझं बडोदा संस्थान सयाजीराव गायकवाड यांचं घराणं आहे. जिथून कुणाकडे वाकड्या नजरेनं बघण्याची सुद्धा शिकवण नाही. त्या जे काही म्हणाल्या की आमच्या सेटवर शिवीगाळ होत नाही. पण तिथं शिवीगाळ होते आणि मला दिलेली आहे. स्वराज्य रक्षक संभाजी, मालिकेत जेव्हा दोन वर्षे मी काम केलं तेव्हा का नाही त्यांना माझा प्रॉब्लेम आला ? माझ्याकडून काहीही चुकीचे वर्तन झालेलं नाही. माझी बदनामी करण्याचं षडयंत्र केलं जात आहे. म्हणून मी स्वतः मालिका सोडली आहे. मला काढलेलं नाही. अशी प्रतिक्रिया प्राजक्ता गायकवाड ने दिलेली आहे.
आई माझी काळूबाई या मालिकेला कोरोनाकाळात अनेक अडचणींचा सामना करावा लागला. याच सेटवर कोरोनाही पसरला होता. त्यात जेष्ठ अभिनेत्री आशाताई यांची कोरोना मुळे प्राण ज्योज ही मावळली.
आता प्राजक्ता च्या जागेवर बिग बॉस फेम विना जगताप काम करणार आहे. पण आता प्रश्न हा उद्धभवत आहे की मालिका कितपत आता चालू शकेल. एक अभिनेत्री प्रेक्षकांच्या घराघरात पोहचली होती.
जिचे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी मालिकेत काम केल्यामुळे आधीच खूप चाहते होते ती सोडून गेल्यावर काय होईल ? तर टीआरपी काही काळासाठी तरी घसरू शकेल नाहीतर वीणा जगताप यांनी जर भूमिकेत जीव ओतला तर फायदा ही होईल.
पण बाकी काहीही का होईना अचानकपणे मालिका सोडुन दिल्याने निर्मात्यांना जबर फटका बसलेला आहे. काही जण प्राजक्ता गायकवाड चं समर्थन करत आहेत. तर काही टीकाही करत आहेत.
आता प्राजक्ता ने दिलेल्या प्रतिक्रिया नंतर पुन्हा अलका कुबल काय प्रतिक्रिया देतायत याकडे सर्वांचे लक्ष लागलेलं आहे.