Poonam Pandey

हॉट आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध असलेली पूनम पांडेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता दिसून येत आहे. मध्यंतरी गोव्यात लग्नानंतर नवऱ्या सोबत हनिमूनला गेलेल्या पूनम पांडेला नवऱ्याकडून मारहाण झाल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे पूनम पांडे खूप चर्चेत आली होती.

आता सुद्धा ती चर्चेत आलेली आहे. अश्लील व्हिडीओ आणि फोटो शूट मुळे पूनम पांडे अडचणीत आलेली आहे. तिच्यावर गोवा फॉरवर्ड पार्टीच्या महिला शाखेतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इतकंच नव्हे तर तिचा व्हिडीओ शूट करणाऱ्या विरुद्ध ही गुन्हा दाखल केला आहे.

गोव्याच्या चापोली धरणावर पूनम पांडे या अभिनेत्रीने अश्लील व्हिडीओ शूट केल्याने विरोधक चालू सरकार वर खूप आक्रमक झालेले आहेत.

त्यांनी सरकारला धारेवर धरताना वक्तव्य केलं, की आपण गोव्याला पॉर्न शहर बनवत आहात.

एक चांगली सुसंस्कृत प्रदेश म्हणून आपण नावारूपाला येण्याची गरज असताना, एंटरटेनमेंट इंडस्ट्री अश्लील व्हिडीओ शूट ला परवानगी देतीच कशी ? दोषींवर लवकरच कडक कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यापूर्वी पूनम पांडे नवऱ्यासोबत हनिमून ला झालेल्या वादांमुळे चर्चेत आली होती. कारण असं होतं की तिने नवरा सॅम वर अत्याचार केल्याचा आरोप केला होता.

पण आता तो अत्याचार नाही तर प्रेम करतो, म्हणून आम्ही पुन्हा एकत्र आलेलो आहोत अशी मीडियाला प्रतिक्रिया देताना पूनम पांडे म्हणाली.

अश्या प्रकारे गोव्यात सध्या पूनम पांडे प्रकरणाची फार चर्चा सुरू आहे.