ताज्या घडामोडी तुमच्या व्हाट्सअँप वर मिळवण्यासाठी आताच LikeUp जॉईन करा. 👉Join

मराठी सिनेमा जगतामध्ये कोरोना कालावधीनंतर पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण तयार झाले असून अनेकविध प्रकारचे चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहेत. नव्या दमाच्या नव्या पण अनुभवी चित्रपटकर्मीना घेऊन पर्व फिल्म्सने नवा सिनेमा आणण्याचे ठरवले आहे.

‘पिरेम” असे या आगामी मराठी चित्रपटाचे नाव असून सिनेमाच्या शीर्षकावरून ही एक लव्हस्टोरी आहे हे समजते. गेल्या काही काळापासून मराठीत नवतरुणाई आणि नवनवीन अभिनेते-अभिनेत्रींना लव्हस्टोरी कथा असलेल्या सिनेमांद्वारे मराठी सिनेमाच्या रूपेरी पडद्यावर आणण्याचा एक ट्रेंडच दिसून येत आहे.

पिरेम” हा नवा मराठी सिनेमाही या पठडीतील असून या सिनेमाचा नुकताच टीझर युट्यूबद्वारे प्रदर्शित करण्यात आला आहे. पर्व फिल्म्स प्रस्तुत ‘पिरेम” या सिनेमाचा हा टीझर प्रेमाच्या निरनिरळ्या छटा दाखवणारा आणि मुख्य म्हणजे नवीन कलावंत जोडी या सिनेमाद्वारे रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार असल्यामुळे या टीझरद्वारे प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे.

पर्व फिल्म्स प्रस्तुत पिरेम” या सिनेमाचे निर्मिता विश्वजीत विठ्ठल पाटील यांनी केली असून दिग्दर्शक प्रदीप रंगराव लायकर आहेत. तर सुप्रसिद्ध संगीतकार जोडी रोहन-रोहन यांनी या सिनेमाला संगीत दिले आहे. 3 डिसेंबर 2021 रोजी हा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे.