मराठ्यांची एक मकरसंक्रांत अशीही… आपण साधा क्रिकेट सामना जरी हरलो तरी “पानिपत झाले” असा वाक्यप्रचार सहजपणे वापरतो. पण जर इतिहास वाचला तर तुम्हाला कळेल कि पानिपतावर जे घडले तो फक्त पराभव नसून भविष्यातील राष्ट्रानिर्मितीचे कालखंड सुरु झाले होते. सन १७६१, बुधवार. संक्रांतीचा दिवस. अहमदशाह अब्दाली आणि मराठ्यांची ती लढाई. पानिपतचे तिसरे युद्ध आणि त्याचीच ही कथा.

या घटनेमागील पार्श्वभूमी म्हणजे आपला इस्लाम धोक्यात आहे असं गृहीत धरलेला अब्दाली आणि त्याची ती अफगाणांची फौज उत्तरभारत काबीज करायला निघाला होता आणि असं करून त्याने मराठ्यांशी वैर जोडलं होतं. आपली बक्कळ सेना घेऊन अब्दाली दिल्लीपर्यंत आलेलाच होता कि इथून सदाशिव भाऊ आपले एक लाखांपेक्षा जास्त सैनिक घेऊन दिल्लीला निघाले. सोबतच होळकर, शिंदे, बुंदेले, सुरजमल आणि जाट येऊन मिळाल्याने ताकद आता हत्त्यासारखी बलाढ्य झाली होती.

भाऊंनी दिल्ली काबीज केली. परंतु यमुनेला पूर असल्यामुळे अब्दालीशी आमोरा-समोर लढाई होऊ शकत नव्हती. त्यात दिल्लीत होत असलेल्या कायमच्या लुटमारीमुळे भकास झाली होती आणि आता मराठा सैनिकांना उपासमार सहन करावा लागत होता. दुष्काळात तेरावा महिना, भौंशी काही मतभेदानंतर जाट आणि शिखांनी आपले सैन्य माघारी फिरवले. बरेच जण पानिपताच्या संपूर्ण नाट्यामधील ही घटना निर्णायक मानतात.

संक्रांतीचा तो दिवस, दुपारचा आकाशात सूर्य आग ओकत होता आणि मर्द मराठे जमिनीवर. शिंदे, होळकर, गायकवाड, माने, सगळेच्या सगळे उपाशी पोटी अंगाची लाही होत असताना, पाण्यात पाण्याचा थेंब नसताना अब्दालीच्या सैन्याला पाणी पाजत होते. मग अब्दाली आपली दुसरी चाल खेळला.

आतापर्यंत राखून ठेवलेली सैनिक तुकडी त्याने लढाईसाठी समोर केली आणि युद्धाचा सारा खेळ पालटला. उपाशी व थकलेल्या मराठ्यांना, ताज्या दमाच्या शत्रूसैन्याने कापून काढण्यास सुरुवात केली, नरसंहार सुरु झाला! प्रत्येक अफगाणी आता काळ बनून वार करत चालला होता. मराठ्यांचे पानिपत झाले होते.

पानिपतचे युद्ध हे इतिहासाला कलाटणी देणारे निर्णायक युद्ध होते. हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते, तर त्यांनी हिंदुस्थानवर एकछत्री अंमल प्रस्थापित केला असता. त्यामुळे नंतर ब्रिटिशांना भारत विजय अशक्य झाला असता. या युध्दात असंख्य योध्यांनी आपल्या धेयासाठी राष्ट्रासाठी प्राणपणाने निकराची झुंज दिली. त्यासर्व नरवीरांना STAR Marathi कडून विनम्र अभिवादन…!

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.