‘Oli Ki Suki’ Marathi Movie New Poster Launch ‘Tejashri Pradhan’ 

Oli Ki Suki Upcoming Marathi Movie In Tejashri Pradhan

बहुचर्चित ‘ओली की सुकी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित!

महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवामध्ये उत्कृष्ट चित्रपट आणि पदार्पण उत्कृष्ट दिग्दर्शक या विभागामध्ये नामांकन मिळवण्यात यशस्वी झालेल्या आनंद गोखले दिग्दर्शित Oli Ki Suki  ‘ओली की सुकी’ या चित्रपटाचे पोस्टर सोशल मिडियावर नुकतेच प्रदर्शित झाले आहे.

समाजात जगताना आपण सगळेच कधी स्वतःच्या मर्जीने तर कधी परिस्थितीमुळे मुखवटे चढवून जगत असतो. पण कधीतरी आयुष्याला कलाटणी देणारी व्यक्ती येते आणि आपले अवघे आयुष्यच बदलून जाते.Oli Ki Suki  ‘ओली की सुकी’ मधील वस्तीत राहणाऱ्या मुलांच्या बाबतीत कदाचित असेच काहीतरी घडले असावे. ‘होणार सून मी या घराची’ या मालिकेमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेली तेजश्री प्रधान एका समजूतदार, प्रेरणादायी अशा भूमिकेतून या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

निर्माते वैभव उत्तमराव जोशी यांच्या नलिनोत्तम प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘जिंदगीला नडणारे आवडतात, रडणारे नाय! असे म्हणणाऱ्या या चित्रपटात समाजाने वाया ठरवलेल्या मुलांवर भाष्य करण्यात आले आहे.

अतिशय संवेदनशील विषयावर असणाऱ्या या बालचित्रपटात ‘Tejashri Pradhan’ तेजश्री प्रधानसह भार्गवी चिरमुले, संजय खापरे, शर्वरी लोहोकरे, सुहास शिरसाट, बालकलाकार चिन्मय संत आणि १० ते १२ बालकलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

नवीन प्रदर्शित झालेल्या पोस्टरमुळे चित्रपटाविषयी उत्कंठा वाढली असून लवकरच म्हणजे २६ मे रोजी हा चित्रपट रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.